

इस्लामाबाद : अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम चर्चा पुन्हा रुळावर आणण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विशेष दूत शनिवारी पाकिस्तानात दाखल होत असतानाच इराणने अमेरिकेसोबत कोणत्याही प्रकारच्या थेट चर्चेची शक्यता फेटाळून लावल्याने या दोन देशांमधील चर्चेच्या दुसऱ्या फेरीचे भवितव्य अधांतरी आहे. अमेरिकेचे दूत स्टीव्ह विटकॉफ आणि जारेड कुशनर हे इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराघची यांची भेट घेणार होते. परंतु, कोणतीही थेट चर्चा होणार नसल्याचे इराणी परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. पाकिस्तानचे अधिकारी दोन्ही बाजूंमधील निरोप पोहोचवण्याचे काम करतील. पाकिस्तानच्या विनंतीनुसार ट्रम्प यांनी या आठवड्यात इराणसोबतच्या युद्धविरामाला मुदतवाढ दिली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान दोन्ही देशांना पुन्हा चर्चेच्या टेबलावर आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
इराणने आपल्या काही अटी आणि चिंता पाकिस्तानकडे व्यक्त केल्या आहेत. अमेरिकेचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल झाल्यावर इस्लामाबाद हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवेल. जर अमेरिकेने या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिला, तरच इस्लामाबादमध्ये थेट चर्चेची दुसरी फेरी पार पडेल. पुरवठा आणि अर्थव्यवस्थेवर निर्माण झालेला धोका दूर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सहा महिन्यांचा काळ
पेंटागॉनमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर स्फोटके पेरली आहेत. ही सामुद्रधुनी पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी किमान सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. अमेरिकेचे संरक्षण सचिव पीट हेगसेथ यांनी या कालमयदिला भेट दुजोरा दिला नसला तरी, ही मोहीम आव्हानात्मक असल्याचे मान्य केले आहे. आम्ही योग्य वेळेत ही सुरुंगे शोधून नष्ट करू असा आम्हाला विश्वास आहे, असे हेगसेथ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
माइन स्वीपर्स
ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणला इशारा दिला असून, जे कोणी समुद्रात सुरुंग पेरताना आढळतील त्यांच्यावर थेट हल्ला करण्याचे आदेश नौदलाला दिले आहेत. आमचे माइन स्वीपर्स सध्या सामुद्रधुनीमध्ये कार्यरत आहेत आणि मी ही मोहीम तिप्पट वेगाने राबवण्याचे आदेश दिले आहेत, असे ट्रम्प यांनी नमूद केले.
अमेरिकेचे शिष्टमंडळ लवकरच दाखल होणार
व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्क्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेचे मध्यपूर्व विशेष दूत स्टीव्ह विटकॉफ आणि अध्यक्ष ट्रम्प यांचे सल्लागार जेरेड कुश्नर हे इराणच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी पाकिस्तानाच्या वाटेवर आहेत. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने सध्यातरी अमेरिकेसोबत कोणतीही बैठक नियोजित नसल्याचे म्हटले आहे.
तेहरानहून विमानसेवा सुरू
कैरो अमेरिका आणि इस्रायलसोबत गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या संघर्षांनंतर, इराणने शनिवारी तेहरानच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आपली व्यावसायिक विमानसेवा अधिकृतपणे पुन्हा सुरू केली आहे.
इराणच्या सरकारी टेलिव्हिजनने दिलेल्या वृत्तानुसार, तेहरानमधील इमाम खोमेनी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इस्तंबूल, ओमानची राजधानी मस्कत आणि सौदी अरेबियातील मदिना शहरासाठी विमानांनी उड्डाण केले.
'फ्लाइटराडार २४' या विमान वाहतुकीवर लक्ष ठेवणाऱ्या प्लॅटफॉर्मने पुष्टी केली आहे की, शनिवारी सकाळी इस्तंबूलच्या दिशेने किमान तीन विमानांनी उड्डाण केले. अमेरिकेसोबत झालेल्या युद्धविराम करारानंतर इराणने या महिन्याच्या सुरुवातीला आपले हवाई क्षेत्र अंशतः खुले केले होते. या करारामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष थांबण्यास मदत झाली आहे.
या विमानसेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव निवळण्याचे आणि जनजीवन पूर्वपदावर येण्याचे संकेत मिळत आहेत.
सुरुंग शोधमोहीम
दरम्यान, इराणसोबतच्या युद्धानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणाव निवळण्याची चिन्हे दिसत नसून, या महत्त्वाच्या सागरी मार्गातील इराणने पेरलेले समुद्री सुरुंग शोधून ते नष्ट करण्यासाठी अमेरिकेने मोठी मोहीम हाती घेतली आहे. ट्रम्प यांनी नौदलाला ही सुरुंगे तातडीने हटवण्याचे आदेश दिले असून, यामुळे जागतिक तेल