...तरच जागतिक व्यापारासाठी 'होर्मुझचा सामुद्रधुनी' मार्ग खुला ठेवू; इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांचा इशारा

अमेरिकेने इराणला धमक्या देणे किंवा त्यांच्यावर हल्ला करणे थांबवले, तरच जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘होर्मुझचा सामुद्रधुनी’ मार्ग खुला ठेवेल, असे विधान इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी केले आहे.
...तरच जागतिक व्यापारासाठी 'होर्मुझचा सामुद्रधुनी' मार्ग खुला ठेवू; इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांचा इशारा
...तरच जागतिक व्यापारासाठी 'होर्मुझचा सामुद्रधुनी' मार्ग खुला ठेवू; इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांचा इशाराप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

तेहरान : अमेरिकेने इराणला धमक्या देणे किंवा त्यांच्यावर हल्ला करणे थांबवले, तरच जागतिक व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ‘होर्मुझचा सामुद्रधुनी’ मार्ग खुला ठेवेल, असे विधान इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रझाई यांनी केले आहे.

‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग’ या इराणी सरकारी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रझाई यांनी स्पष्ट केले की, धोरणात्मक सागरी मार्गाबाबत इराणची भूमिका थेट वॉशिंग्टनच्या लष्करी कारवाया आणि भूमिकेशी जोडलेली आहे. जेव्हा अमेरिका इराणला धमकी देणार नाही किंवा हल्ला करणार नाही, तेव्हाच इराण होर्मुझची सामुद्रधुनी खुली ठेवण्यास वचनबद्ध असेल, असे रझाई म्हणाले.

सागरी निर्बंध वाढवणार

इराण येत्या काही दिवसांत होर्मुझच्या सामुद्रधुनीबाहेर एका नवीन प्रतिबंधित सागरी क्षेत्राची योजना आखत असून, हे निर्बंध पर्शियन आखाताच्या काही भागांपर्यंत वाढवले जाऊ शकतात, अशी माहितीही रझाई यांनी दिली. हे क्षेत्र अमेरिकन नौदल नाकेबंदी रेषेपासून सुरू होऊन पर्शियन आखाताच्या भागांचा समावेश करेल. या नवीन क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या जहाजांवर इराणकडून कारवाई केली जाईल, असा इशारा देताना रझाई म्हणाले, या नवीन क्षेत्रात प्रवेश करणाऱ्या कोणत्याही जहाजाचा समावेश बंदी (सॅन्क्शन्स) यादीत केला जाईल.

आमच्या मालमत्तेवर हल्ला केला तर चोख प्रत्युत्तर मिळेल, इराणचा अमेरिकेला इशारा

इराणच्या संसदेचे अध्यक्ष (स्पीकर) मोहम्मद बागेर गालिबाफ यांनी सोमवारी वॉशिंग्टनला इराणी ऊर्जा केंद्रांविरोधात कोणतीही दु:साहस (हल्ला) न करण्याचा सडेतोड इशारा दिला असून, याचे तीव्र परिणाम भोगावे लागतील अशी चेतावणी दिली आहे. एक्सवरील एका पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, इराणची तेल आणि नैसर्गिक वायूची उत्पादन साखळी ही ‘विस्तीर्ण, सहज पोहोचण्यायोग्य आणि उघडी (असुरक्षित)’ आहे.

याच सागरी क्षेत्रातील आणि प्रकल्पांमधील अमेरिकन तेल व वायू कंपन्या देखील तितक्याच असुरक्षित आहेत. आमच्या मालमत्तेवर हल्ला केला तर तुम्हालाही फटका बसून चोख प्रत्युत्तर दिले जाईल. आम्ही हे आधीच सिद्ध करून दाखवले आहे. जे लष्करी तळ आता वापरण्यायोग्य उरलेले नाहीत, त्यांनाच जाऊन विचारा.

होर्मुझ खुली असल्याचा दावा ‘सपशेल खोटा’

पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझ सामुद्रधुनी खुली असल्याचा दावा केला होता. इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसेन रेझाई यांनी हा दावा फेटाळून लावत ट्रम्प यांचा दावा ‘सपशेल खोटा’ असल्याचे म्हटले आहे. तसेच, या धोरणात्मक जलमार्गाच्या पलीकडे एक नवीन ‘प्रतिबंधित क्षेत्र’ लवकरच जाहीर केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. इराणच्या ‘इस्लामिक रिपब्लिक ऑफ इराण ब्रॉडकास्टिंग’ या सरकारी माध्यमाला दिलेल्या मुलाखतीदरम्यान रेझाई यांनी सांगितले की, होर्मुझ सामुद्रधुनी ‘पूर्णपणे बंद’ आहे आणि या भागातून जहाजांची वाहतूक अत्यंत मर्यादित करण्यात आली आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in