

तेहरान : अमेरिका-इस्रायल विरुद्ध इराण असा संघर्ष शिगेला पोहचलेला असताना इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी अमेरिकन लोकांसाठी एक खुले पत्र लिहिले आहे. अमेरिकी जनतेला उद्देशून लिहिलेल्या एका खुल्या पत्रात, पेझेश्कियन यांनी प्रश्न उपस्थित केला की, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे ‘अमेरिका फर्स्ट’ धोरण आज अमेरिकी सरकारच्या प्राधान्यक्रमांपैकी खरोखरच एक आहे का. तसेच अमेरिकेतील लोकांना ‘विकृतीकरण आणि बनावट कथांच्या महापुराच्या’ पलीकडे पाहण्याचे आणि इराणविरुद्धच्या अमेरिका-इस्रायल युद्धामुळे कोणाचे हित साधले जात आहे, हे विचारण्याचे आवाहनही पेझेश्कियन यांनी केले आहे.
कोणत्या हितांची पूर्तता
या युद्धामुळे अमेरिकन जनतेच्या नेमक्या कोणत्या हितांची खऱ्या अर्थाने पूर्तता होत आहे, असा सवालही त्यांनी केला आहे. निष्पाप मुलांची कत्तल, कर्करोगावर उपचार करणाऱ्या औषधनिर्माण सुविधांचा विध्वंस किंवा एखाद्या देशाला ‘पाषाणयुगात परत नेल्याबद्दल’ बढाई मारणे, यांमुळे अमेरिकेची जागतिक प्रतिष्ठा आणखी खराब करण्याव्यतिरिक्त दुसरा कोणता उद्देश साध्य होतो का, असा सवालही मसूद पेझेश्कियान यांनी उपस्थित केला आहे.