...तर संपूर्ण पर्शियन आखातात सुरुंग पेरणार; इराणचा आखाती देशांना इशारा

इस्रायलने इराणवर नव्याने हल्ले सुरू केल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, इराणच्या संरक्षण परिषदेने सोमवारी एक मोठा इशारा दिला असून, जर इराणवर जमिनीवरून आक्रमण झाले, तर संपूर्ण पर्शियन आखातात समुद्री सुरुंग पेरले जातील, अशी धमकी इराणच्या संरक्षण परिषदेने सोमवारी दिली आहे.
...तर संपूर्ण पर्शियन आखातात सुरुंग पेरणार; इराणचा आखाती देशांना इशारा
...तर संपूर्ण पर्शियन आखातात सुरुंग पेरणार; इराणचा आखाती देशांना इशाराप्रातिनिधिक छायाचित्र
Published on

दुबई : इस्रायलने इराणवर नव्याने हल्ले सुरू केल्यानंतर मध्यपूर्वेतील तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, इराणच्या संरक्षण परिषदेने सोमवारी एक मोठा इशारा दिला असून, जर इराणवर जमिनीवरून आक्रमण झाले, तर संपूर्ण पर्शियन आखातात समुद्री सुरुंग पेरले जातील, अशी धमकी इराणच्या संरक्षण परिषदेने सोमवारी दिली आहे.

इराणच्या संरक्षण परिषदेने स्पष्ट केले की, शत्रूने इराणचे किनारे किंवा बेटांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केल्यास, लष्करी धोरणानुसार समुद्री सुरुंग पेरणार

पर्शियन आखातातील सर्व प्रवेश मार्ग आणि किनारपट्टीवर सुरुंग पेरले जातील.अमेरिकन मरीन कोअरचे सैनिक या भागात दाखल होण्याची शक्यता असल्याने तेहरानमधील चिंता वाढली आहे. या धास्तीपोटीच इराणने हे आक्रमक विधान केले आहे.

ऊर्जा पुरवठा आणि इस्त्रायलचा धोका

इंधन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे असलेले 'होर्मुझची सामुद्रधुनी' खुली ठेवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशील आहे. यासाठी अमेरिकन सैनिकांकडून इराणची बेटे किंवा भूभाग ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुसरीकडे, इस्रायलनेही जमिनीवरून लष्करी कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in