ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने UNSC ला लिहिले पत्र

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी इराणला खुली धमकी दिली होती. ‘इराणने जर क्षेपणास्त्र आणि आण्विक चाचणी कार्यक्रम पुन्हा सुरू केला तर अमेरिका त्यांच्यावर हल्ला करण्यास तयार असेल’, असा इशारा ट्रम्प यांनी होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर देत एक मोठा निर्णय घेतला आहे.
ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने UNSC ला लिहिले पत्र
ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणने UNSC ला लिहिले पत्र
Published on

तेहरान : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी इराणला खुली धमकी दिली होती. ‘इराणने जर क्षेपणास्त्र आणि आण्विक चाचणी कार्यक्रम पुन्हा सुरू केला तर अमेरिका त्यांच्यावर हल्ला करण्यास तयार असेल’, असा इशारा ट्रम्प यांनी होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता इराणने अमेरिकेला प्रत्युत्तर देत एक मोठा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प यांच्या धमक्यांना इराणने बेपर्वा आणि चिथावणीखोर धमक्या असे संबोधले असून ट्रम्प यांच्या अशा प्रकारच्या धमक्यांच्या विरोधात इराणने थेट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला (यूएनएससी) पत्र लिहिले आहे. इराणचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूत अमीर-सईद इरावानी यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला पत्र लिहित ट्रम्प यांच्या धमकीबाबत निषेध व्यक्त केला आहे.

अशा विधानांमुळे उद्भवणाऱ्या कोणत्याही परिणामांची किंवा वाढत्या तणावाची संपूर्ण जबाबदारी अमेरिकेची असेल, असे इराणने म्हटले आहे. राजदूत अमीर-सईद इरावानी यांनी म्हटले आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांचे हे विधान इराणमध्ये हिंसाचार, अशांतता आणि दहशतवादी कृत्यांना चिथावणी देण्यासारखे आहे. एका सार्वभौम राष्ट्राविरुद्ध बळाचा वापर करण्याची ही धमकी योग्य नाही.

तेहरानच्या कारवायांवर आमचे बारकाईने लक्ष आहे. जर इराणने आपल्या क्षेपणास्त्र आणि आण्विक चाचणी पुन्हा विकसित करण्याचा प्रयत्न केला तर त्यावर तत्काळ हल्ला करण्यास अमेरिका समर्थन देईल. इराण काय करत आहे हे आपल्याला अचूकपणे माहिती आहे. मला आशा आहे की ते त्या दिशेने वाटचाल करणार नाहीत, कारण आपल्याला बी-२ वर (बी-२ बॉम्बर हे अमेरिकेचं लढाऊ विमान आहे) पुन्हा इंधन जाळायचं नाही, असे ट्रम्प यांनी म्हटले होते.

इराणमध्ये नेमके काय सुरू

इराणमध्ये महागाईचा भडका उडाला असून त्या विरोधात हजारो लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अमेरिका व पाश्चिमात्य देशांनी इराणवर निर्बंध लादल्याने इराणमध्ये डिसेंबर महिन्यात महागाई ४२.५ टक्क्यांनी वाढली आहे. इस्रायलबरोबर जूनमध्ये चाललेल्या सात दिवसांच्या संघर्षाचाही इराणच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्यामुळे इराणमध्ये सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना सत्तेवरून हटवण्याची मागणी जोर धरत आहे.

logo
marathi.freepressjournal.in