

वॉशिंग्टन : अमेरिका आणि नायजेरियाच्या सैन्याने शुक्रवारी केलेल्या एका संयुक्त मोहिमेत इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेचा मोठा नेता अबू बक्र अल्-मैनुकी याला ठार केले आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नायजेरियेतील मोहिमेची माहिती रात्री उशिरा सोशल मीडिया पोस्टद्वारे दिली. अबू मैनुकी हा इसिसचा जागतिक पातळीवरील दुसऱ्या क्रमांकाचा कमांडर होता. तो आफ्रिकेत लपू शकतो असे त्याला वाटले होते, परंतु आमच्या स्रोतांनी त्याच्या प्रत्येक हालचालीची माहिती दिली, असे ट्रम्प यांनी नमूद केले.
अबू अल्-मैनुकी हा इसिसच्या जागतिक संघटनात्मक बांधणी आणि आर्थिक व्यवहारांमधील मुख्य सूत्रधार होता. तो अमेरिकेसह त्यांच्या हितसंबंधांवर हल्ले करण्याची योजना आखत होता, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर एका अधिकाऱ्याने दिली.