इराणमधील दोन अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला; सेंट्रिफ्यूज सुविधा उद्ध्वस्त

इस्रायलने बुधवारी इराणवर शक्तिशाली हवाई हल्ले केल्याने तेहरान आणि त्याच्या आसपासच्या अणु प्रकल्पातील दोन सेंट्रिफ्यूज उत्पादन सुविधांसह प्रमुख लष्करी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने दिले आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष इस्रायलच्या या ताज्या हल्ल्यांमुळे आणखी तीव्र झाला असून, यामुळे प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली आहे.
इराणमधील दोन अणुऊर्जा केंद्रांवर इस्रायलचा हल्ला; सेंट्रिफ्यूज सुविधा उद्ध्वस्त
Published on

जेरुसलेम : इस्रायलने बुधवारी इराणवर शक्तिशाली हवाई हल्ले केल्याने तेहरान आणि त्याच्या आसपासच्या अणु प्रकल्पातील दोन सेंट्रिफ्यूज उत्पादन सुविधांसह प्रमुख लष्करी पायाभूत सुविधा उद्ध्वस्त झाल्याचे वृत्त आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने दिले आहे. गेल्या सहा दिवसांपासून सुरू असलेला संघर्ष इस्रायलच्या या ताज्या हल्ल्यांमुळे आणखी तीव्र झाला असून, यामुळे प्रादेशिक युद्धाची भीती निर्माण झाली आहे.

लढाऊ विमानांचा समावेश

इस्रायलच्या लष्कराने काल रात्री इराणच्या सेंट्रिफ्यूज उत्पादन स्थळावर आणि अनेक शस्त्रास्त्र उत्पादन स्थळांवर हल्ला केला, असे इस्रायलच्या सैन्याने एका निवेदनात म्हटले आहे. या ऑपरेशनमध्ये ५० हून अधिक लढाऊ विमानांचा समावेश होता. गुप्तचर शाखेच्या अचूक मार्गदर्शनाखाली, गेल्या काही तासांत ५० हून अधिक हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी तेहरान परिसरातील लष्करी लक्ष्यांवर हल्ले केले आहेत, असे त्यामध्ये पुढे म्हटले आहे.

इस्रायलच्या संरक्षण दलाने म्हटले आहे की, ज्या सेंट्रिफ्यूज साइटवर हल्ला केला, त्या सेंट्रिफ्यूजमुळे इराणच्या अण्वस्त्रांसाठी युरेनियम समृद्धीकरण क्षमतेला गती मिळणार होती. इराण सरकार अण्वस्त्रे विकसित करण्यासाठी बनवलेल्या युरेनियमचे समृद्धीकरण करत आहे.

logo
marathi.freepressjournal.in