इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ६० ठार

इस्रायलने गेल्या २४ तासांत गाझात केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गाझाच्या आरोग्य खात्याने दिली आहे. गाझातील हल्ले थांबवण्यासाठी इस्रायलवर जागतिक पातळीवरून मोठा दबाव आहे. गेल्या तीन महिन्यांपासून इस्रायलने गाझात मानवी मदत थांबवली आहे.
इस्रायलच्या हल्ल्यात गाझात ६० ठार
Published on

देर-अल-बलाह : इस्रायलने गेल्या २४ तासांत गाझात केलेल्या हवाई हल्ल्यात ६० जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती गाझाच्या आरोग्य खात्याने दिली आहे. गाझातील हल्ले थांबवण्यासाठी इस्रायलवर जागतिक पातळीवरून मोठा दबाव आहे. गेल्या तीन महिन्यांपासून इस्रायलने गाझात मानवी मदत थांबवली आहे.

इस्रायली रणगाडे व ड्रोननी शुक्रवारी सकाळी उत्तर गाझाच्या रुग्णालयांवर हल्ले केले. यामुळे एकच अग्निकल्लोळ उठला. त्यामुळे रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले, अशी माहिती पॅलेस्टाईन रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. जोपर्यंत इस्त्राएलचे ५८ ओलीसांची सुटका होणार नाही. तोपर्यंत हमासवर हल्ले सुरूच राहतील, असे इस्त्राएलने सांगितले.

तसेच गाझातील नागरिकांना मदत मिळण्यासाठी जागतिक स्तरावरून दबाव वाढल्याने इस्त्राएलने शुक्रवारी १०० ट्रक मदतीला परवानगी दिली. यात पीठ, अन्न, वैद्यकीय उपकरणे व औषधे आदींचा समावेश आहे. पण, संयुक्त राष्ट्रांच्या माहितीनुसार, ही मदत अत्यंत अपुरी आहे. कारण शस्त्रसंधीपूर्वी रोज गाझात ६०० ट्रक मदत येत होती. इस्त्राएलच्या लष्करी निर्बंधामुळे गाझात मदतीचे वाटप करणे कठीण बनले आहे.

logo
marathi.freepressjournal.in