इराणच्या अणुकेंद्रावर इस्रायलचे हल्ले सुरूच

इराणच्या अणुकेंद्रावर इस्रायलचे हल्ले सुरूच

इस्रायली सैन्य दलाने इराणच्या अणुकेंद्रावर सलग दुसऱ्या आठवड्यात हल्ले सुरूच ठेवले आहेत. दरम्यान, इराणच्या सैन्य दलाच्या तीन कमांडरना इस्रायलने ठार केले. शनिवारी सकाळी इस्फहान आण्विक केंद्रावर इस्रायलने हल्ला केला. या अणुकेंद्रातील सेंट्रीफ्यूज उत्पादनाला लक्ष्य केले. गेल्या २४ तासांत या अणुकेंद्रावर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. इराणचा अणुकार्यक्रम नष्ट करण्यासाठी इस्रायल प्रयत्नशील आहे.
Published on

तेल अवीव : इस्रायली सैन्य दलाने इराणच्या अणुकेंद्रावर सलग दुसऱ्या आठवड्यात हल्ले सुरूच ठेवले आहेत. दरम्यान, इराणच्या सैन्य दलाच्या तीन कमांडरना इस्रायलने ठार केले. शनिवारी सकाळी इस्फहान आण्विक केंद्रावर इस्रायलने हल्ला केला. या अणुकेंद्रातील सेंट्रीफ्यूज उत्पादनाला लक्ष्य केले. गेल्या २४ तासांत या अणुकेंद्रावर हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. इराणचा अणुकार्यक्रम नष्ट करण्यासाठी इस्रायल प्रयत्नशील आहे.

इस्रायलकडून होणाऱ्या हल्ल्याला इराण ड्रोन व क्षेपणास्त्राद्वारे प्रत्युत्तर देत आहे. या हल्ल्यात इस्रायलचे किती नुकसान झाले हे समजू शकले नाही. इराणकडून रात्रभर इस्रायलवर हल्ले सुरू आहेत. इराणच्या ड्रोनने उत्तर इस्रायलमधील दोन मजली इमारतीला लक्ष्य करण्यात आले.

इराणमधून ५१७ भारतीय मायदेशी

नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंधू’अंतर्गत इराणमधून ५१७ भारतीयांना मायदेशी आणण्यात आले आहे, अशी माहिती परराष्ट्र व्यवहार खात्याने दिली. विद्यार्थ्यांसह भारतीय नागरिकांना विशेष विमानाने शुक्रवारी रात्री मायदेशी आणण्यात आले. इराण सरकारने भारतासाठी स्वत:ची हवाई हद्द खुली करून दिली.

खामेनींच्या उत्तराधिकाऱ्यांची नावे निश्चित

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धात कोणत्याही क्षणी अमेरिकेचा हस्तक्षेप होऊ शकतो आणि आपली तीन दशकांची राजवट पणाला लागू शकते, यासाठी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी तीन उत्तराधिकाऱ्यांची नावे निश्चित केली आहेत. विशेष म्हणजे, या यादीत त्यांचे पुत्र मोज्तबा यांचे नाव नाही. खामेनी यांनी इराणच्या सर्वोच्च नेतेपदासाठी तीन धर्मगुरूंची नावे सूचवली असून त्याची जाहीर घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता इराण आरपारची लढाईत असल्याचे दिसून येते.

logo
marathi.freepressjournal.in