
दर-अल-बलह : इस्रायलने गाझावर सलग दुसऱ्या दिवशी हल्ले सुरूच ठेवले आहेत. या हल्ल्यात ८५ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती तीन रुग्णालयांनी दिली.
खान युनूस, रफाह व बेत लहिया या शहरावर इस्रायलने हल्ले केले. मध्यरात्री केलेल्या या हल्ल्यात अनेक घरांचे नुकसान झाले असून झोपेत असलेले अनेक स्त्री, पुरुष व बालके या हल्ल्यात बळी पडले.
इस्रायलने मंगळवारपासून गाझावर पुन्हा जोरदार हल्ले सुरू केले आहेत. मंगळवारच्या हल्ल्यात ४०० पॅलेस्टिनी ठार झाले. गेले दीड वर्षे सुरू असलेल्या या संघर्षात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत ४९ हजार पॅलेस्टिनी मरण पावलेले आहेत. गाझातील ९० टक्के लोकसंख्या विस्थापित झाली आहे.