इस्त्रायलच्या तीन शहरांवर गाझा पट्टीतून हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्याची जबाबदारी पॅलेस्टानी संघटना हमासने स्वीकारली आहे. इस्रायलसह अश्कलोन आणि तेल अीव या दोन शहरांवर अनेक क्षेपणास्त्र डागण्यात आले आहेत. शहरांच्या निवासी भागात हा हल्ला करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. अल्जझीराने याबाबतचं वृत्त दिलं आहे. इस्त्रायल आणि पॅलेस्टिनी दहशतवाद्यांमधील संघर्ष फार जुना आहे. आज गाझा पट्टीतून पॅलेस्टानी संघटना हमासने इस्रायलवर क्षेपणास्त्र डागून या पुन्हा एकदा या वादाला तोंड फोडलं आहे.
इस्त्रायलवर झालेला हल्ला हा दहशतवादी हल्ला असून या भागात लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु आहे. पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच वेळी इस्त्रायलने यावर प्रतिक्रिया देत सुद्धासाठी तयार असल्याचं म्हटल आहे. टाईम्स ऑफ इस्रायलने याबाबतचं वृत्त दिलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एनेक हमास अतिरेकी इस्त्रायलमध्ये घुसल्याची माहिती आहे. मात्र, यााबतची कोणतीही अधिकृत माहिती इस्त्रायलकडून देण्यात आलेली नाही. गाझापट्टीतून इस्रायलवर क्षेपणास्त्र डागल्याच्या बातम्या समोर आलेल्या नाहीत. तेल अवीव आणि अश्कोलोन शहरांवर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे. या हल्लानंतर इस्त्रायलकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलं असून युद्धासाठी तयार असल्याचं इस्रायलने म्हटलं आहे. इस्रायलच्या संरक्षण दलाकडून या हल्लाबाबत एक पोस्ट करण्यात आली आहे. यात आज दिवसाची सुरुवात सायरनने झाली आहे. कारण गाझामधून आमच्यावर क्षेपणास्त्र डागले जात आहेत. पण आम्ही स्वत:;चं रक्षण करण्यास सक्षण आहोत, असं सांगण्यात आलं आहे.
पॅलेस्टाईनचा दहशतवादी गट असलेला हमास इस्लामिक जिहादी संघटना आणि उस्रायल यांच्यातील संघर्ष फार जुना आहे. हमास आणि इस्रायलमध्ये मागली १५ वर्षात ४ वेळा युद्ध झालं असून अनेक किरकोळ चकमकी झाल्या आहेत. २०२१ साली इस्त्रायल आणि हमास यांच्यात झालेली लढाई ही अलकडच्या काळातील सर्वात भीषण लढाई मानली जाते.