
देइल अल-बलाह : इस्रायलने पुन्हा एकदा गाझा शहरावर मोठा हल्ला केला असून या हल्ल्यात तब्बल ३२ लोकांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता इस्रायल-हमास यांच्यातील युद्ध कुठपर्यंत चिघळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सध्या इस्रायल आणि हमास यांच्यात घनघोर युद्ध सुरू असून इस्रायली लष्करकडून गाझावर मोठ्या प्रमाणात हल्ला केला जात आहे. फ्रान्स, ऑस्ट्रेलियासह इतरही काही देशांनी पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. यामुळेही इस्रायलने आक्रमक पवित्रा धारण केला आहे. काहीही झाले तरी आम्ही माघार घेणार नाही, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी जाहीर केलेले आहे. इस्रायलने गाझावर पुन्हा एकदा मोठा हवाई हल्ला त्या हल्ल्याबाबत गाझाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली आहे. इस्रायलने २६ सप्टेंबरच्या रात्री गाझावर हवाई हल्ले केले.
पॅलेस्टाईनला मान्यता
इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध संपावे यासाठी अनेक देशांनी पॅलेस्टाईनला राष्ट्र म्हणून मान्यता दिली आहे. यामुळे इस्रायलवर एका प्रकारे दबाव वाढलेला आहे. इस्रायलचा मात्र पॅलेस्टाईनला राष्ट्र संबोधण्यास विरोध आहे. इस्रायलच्या याच धोरणाचा विरोध करत अनेक राष्ट्रांनी अमेरिकेने इस्रायलवर दबाव टाका आणि हे युद्ध थांबवावे असे आवाहन केलेले आहे.