राफा बॉर्डर क्रॉसिंग बंद, इस्त्रायल सरकारचे आदेश

इस्त्रायलच्या नेतान्याहू सरकारने गाझा आणि इजिप्तला जोडणारा एकमेव ‘राफा बॉर्डर क्रॉसिंग’ हा मार्ग ‘पुढील आदेशापर्यंत बंद’ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याच मार्गाद्वारे आतापर्यंत गाझामध्ये मानवी मदत पोहोचवणे आणि लोकांची ये-जा शक्य होत होती.
राफा बॉर्डर क्रॉसिंग बंद, इस्त्रायल सरकारचे आदेश
राफा बॉर्डर क्रॉसिंग बंद, इस्त्रायल सरकारचे आदेश
Published on

कैरो : इस्त्रायलच्या नेतान्याहू सरकारने गाझा आणि इजिप्तला जोडणारा एकमेव ‘राफा बॉर्डर क्रॉसिंग’ हा मार्ग ‘पुढील आदेशापर्यंत बंद’ ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. याच मार्गाद्वारे आतापर्यंत गाझामध्ये मानवी मदत पोहोचवणे आणि लोकांची ये-जा शक्य होत होती.

इस्त्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने निवेदनात सांगितले की, ‘जोपर्यंत हमास करारानुसार सर्व मृतदेह परत देत नाही, तोपर्यंत राफा बॉर्डर उघडली जाणार नाही. आतापर्यंत ‘हमास’ने आणखी दोन बंधकांचे मृतदेह रेड क्रॉसच्या माध्यमातून इस्रायलला परत दिले आहेत.

गेल्या काही आठवड्यांत इस्रायलने युद्धविराम कराराचे तब्बल ४७ वेळा उल्लंघन केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यांमध्ये ३८ लोकांचा मृत्यू झाला असून १४३ जण जखमी झाले आहेत. ऑक्टोबर २०२३ पासून आतापर्यंत गाझामध्ये एकूण ६८,११६ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि १,७०,२०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहेत. त्याच वेळी, इस्रायलमध्ये ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यांमध्ये १,१३९ लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे २०० लोकांना बंदी बनवले गेले होते.

राफा बॉर्डर बंद राहिल्याने गाझातील नागरिकांच्या मदत आणि परतण्याच्या योजनांवर मोठा परिणाम होणार आहे. यापूर्वी इजिप्तमध्ये असलेल्या पॅलेस्टिनी दूतावासाने २० ऑक्टोबरला राफा बॉर्डर पुन्हा उघडण्यात येईल.

logo
marathi.freepressjournal.in