इस्रायली सैन्य गाझात घुसले हमासच्या २५० ठिकाणांवर हल्ले

इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बँक परिसरात इस्रायली सैन्याने ६० हून अधिक संदिग्धांना अटक केली
इस्रायली सैन्य गाझात घुसले हमासच्या २५० ठिकाणांवर हल्ले

जेरुसलेम : इस्रायलच्या लढाऊ विमानांनी गाझातील हमासच्या २५० हून अधिक ठिकाणांवर हल्ले केले आहेत. ज्यात दहशतवाद्यांचे तळ, कमांड सेंटर, रॉकेट लाँचर आदींचा समावेश होता, अशी माहिती इस्रायल डिफेन्स फोर्सने दिली.

इस्रायलच्या सैन्याने गाझात जमिनी कारवाई सुरू केली. सैनिकांनी रणगाड्यांसोबत जमिनीवर हल्ला केला. याचवेळी लढाऊ विमानांनी दहशतवाद्यांवर हल्ले केले. इस्रायली हवाई हल्ल्यात आतापर्यंत ७०२८ पॅलेस्टिनी नागरिक ठार झाले आहेत. यात २९१३ मुले, १७०९ महिला व ३९७ ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

इस्रायलच्या ताब्यातील वेस्ट बँक परिसरात इस्रायली सैन्याने ६० हून अधिक संदिग्धांना अटक केली. त्यात हमासचे ‘४६’ लढवय्ये आहेत. युद्ध सुरू झाल्यावर हजार पॅलेस्टिनी नागरिकांना अटक केली आहे.

लष्कराकडून जोरदार तयारी

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, लष्कर गाझावरील हल्ल्याची तयारी करत आहे. मात्र, ते कधी केले जातील, याबाबत वाच्यता करण्यास नकार दिला. आमचे सार्वभौमत्व रोखण्यासाठी युद्ध करत आहोत. ‘हमास’चे सैन्य व सरकारी क्षमता संपुष्टात आणणे अटक केलेल्या बंधकांना परत आणण्यासाठी प्रयत्न करणे, असे नेत्यानाहू म्हणाले.

logo
marathi.freepressjournal.in