जपानला ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के

जपानला मंगळवारी पहाटे ६.२ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. मात्र त्यामुळे नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. त्याचप्रमाणे त्सुनामीचाही इशारा देण्यात आलेला नाही. पश्चिम चुगोकू प्रदेशात मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले.
प्रातिनिधिक छायाचित्र
प्रातिनिधिक छायाचित्र
Published on

टोकियो : जपानला मंगळवारी पहाटे ६.२ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का बसला. मात्र त्यामुळे नुकसान झाल्याचे वृत्त अद्याप आलेले नाही. त्याचप्रमाणे त्सुनामीचाही इशारा देण्यात आलेला नाही. पश्चिम चुगोकू प्रदेशात मंगळवारी पहाटे भूकंपाचे धक्के जाणवले. जपान हवामानशास्त्र संस्थेच्या म्हणण्यानुसार, पश्चिम चुगोकूमध्ये सुरुवातीला ६.२ तीव्रतेचा भूकंप झाला. त्यानंतर लागोपाठ अनेक मोठे धक्के जाणवले.

जपानमध्ये पहाटे झालेल्या पहिल्या भूकंपाचे केंद्र पूर्व शिमाने प्रीफेक्चरमध्ये होते, असे हवामान शास्त्र संस्थेने सांगितले. चुगोकू इलेक्ट्रिक पॉवर हे भूकंपाच्या केंद्रबिंदूपासून ३२ किमी अंतरावर आहे. जपानच्या अणु नियमन प्राधिकरणाने सांगितले की, या प्रकल्पात कोणतीही अनियमितता नाही. दरम्यान, जपानमध्ये १० मिनिटांच्या अंतराने दोन लागोपाठ भूकंपाचे हादरे बसले. आधी ६.२ तीव्रता होती, तर दुसऱ्या वेळी ५.१ तीव्रतेचे धक्के जाणवल्याची नोंद आहे.

जपान हा भूकंपप्रवण देश आहे. जगातील ६ किंवा त्याहून अधिक तीव्रतेच्या भूकंपांपैकी जवळपास २० टक्के भूकंप जपानमध्ये असल्याची नोंद आहे. जपानमधील नोटो द्वीपकल्पात ७.६ तीव्रतेचा भूकंप झाला होता. त्यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला होता. सुदैवाने मंगळवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे मोठ्या नुकसानीची किंवा जीवितहानीबाबत अद्याप कोणतेही वृत्त नाही. तरीही स्थानिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

logo
marathi.freepressjournal.in