टोकियो : जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा यांनी रविवारी पदाचा राजीनामा दिला. सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीमधील (एलडीपी) फूट टाळण्यासाठी इशिबा यांनी हे पाऊल उचलले, असे वृत्त जपानी माध्यमांनी दिले आहे. जुलैमध्ये झालेल्या वरिष्ठ सभागृह (कौन्सिलर्स हाऊस) निवडणुकीत इशिबा यांचे युती सरकार पराभूत झाले. इशिबा यांनी अलिकडेच याबद्दल माफी मागितली होती आणि राजीनामा देण्याचा निर्णय आपण घेणार असल्याचे सांगितले होते.
निवडणुकीतील पराभवानंतर एलडीपीमधील 'इशिबाला हटवा' चळवळ तीव्र झाली. पक्षाच्या काही नेत्यांनी आणि खासदारांनी त्यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, ज्यामुळे त्यांची स्थिती कमकुवत झाली होती.