कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा

भारताशी सातत्याने संघर्षाची भूमिका घेणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पदाचा आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.
कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचा राजीनामा
Published on

ओटावा : भारताशी सातत्याने संघर्षाची भूमिका घेणारे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी पदाचा आणि कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

कॅनडाचे वर्तमानपत्र ‘ग्लोब ॲॅण्ड मेल’ने सांगितले की, नवीन पंतप्रधान निवडेपर्यंत आपण या पदावर राहू. देशात खासदारांच्या वाढत्या विरोधामुळे ट्रुडो यांना राजीनामा द्यावा लागला आहे.

ट्रुडो म्हणाले की, पक्षाचा नेता व पंतप्रधान म्हणून मी राजीनामा देत आहे. पक्ष नवीन नेता निवडेपर्यंत मी पदावर राहीन. रविवारी रात्री मी लिबरल पक्षाच्या अध्यक्षांना नवीन नेता निवडीची प्रक्रिया सुरू करायला सांगितले आहे.

तुम्हाला पश्चाताप होत आहे का? असे विचारले असता ट्रुडो म्हणाले की, आपल्या देशात सरकार निवडण्याच्या पद्धतीत बदल करण्याची गरज आहे. मतपत्रिकेवर दुसरा व तिसरा सक्षम उमेदवार निवडण्याची मुभा मतदारांना असायला हवी, असे त्यांनी सांगितले.

गेल्या काही वर्षांपासून भारत-कॅनडाचे संबंध टोकाला गेले होते. भारत-कॅनडा तणाव वाढला होता. पंतप्रधान ट्रुडो यांच्या वक्तव्यामुळे त्यात भर पडत होती.

logo
marathi.freepressjournal.in