खलील हय्या 'हमास'चा नवा प्रमुख; सिनवारच्या मृत्यूला दिला दुजोरा

हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याला इस्रायलने ठार केल्यानंतर आता 'हमास'च्या प्रमुखपदी खलील हय्या याची निवड करण्यात आली आहे.
खलील हय्या 'हमास'चा नवा प्रमुख; सिनवारच्या मृत्यूला दिला दुजोरा
एक्स
Published on

गाझा : हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याला इस्रायलने ठार केल्यानंतर आता 'हमास'च्या प्रमुखपदी खलील हय्या याची निवड करण्यात आली आहे. हमासचे नेतृत्व फळीतील अनेक नेते इस्रायलच्या युद्धात मारले गेले आहेत. 'हमास'चा नेता सिनवार याच्या मृत्यूनंतर खलील अल हय्याची निवड संघटनेने केली. हय्या हा सध्या कतारमध्ये राहत असून २००७ मध्ये गाजात झालेल्या इस्त्रायलच्या हवाई हल्ल्यात त्याचे पूर्ण कुटुंब ठार झाले होते. 'हमास'चे नेते हनिये व सिनवार यांचा खलिल अल हय्या याच्यावर विश्वास होता. 'हमास'च्या चर्चा करणाऱ्या पथकाचे नेतृत्व तो करत होता. इराणशी त्याचे चांगले संबंध आहेत.

सिनवार याच्या मृत्यूला दुजोरा

याह्या सिनवार यांच्या मृत्यूला 'हमास'ने दुजोरा दिला आहे. हमासचा नवीन प्रमुख हय्या याने सिनवार याचा मृत्यू झाल्याचे मान्य केले.

आक्रमण बंद झाल्यानंतरच इस्रायली अपहृतांची सुटका

इस्रायल जोपर्यंत गाझा पट्टीतील आक्रमण थांबवत नाही, तोपर्यंत आम्ही पकडलेल्या इस्रायली 'अपहृतां'ची सुटका करणार नाही, असे 'हमास' प्रमुख खलील हय्याने सांगितले.

logo
marathi.freepressjournal.in