खलिस्तानवाद्यांचा अमेरिकेतील भारतीय दूतावासावर हल्ला

या हल्ल्यामुळे भारत आणि अमेरिकेतील राजकीय संबंध बिघडले जाऊ शकतात. या हल्ल्याने शांतताप्रिय शीख समाजाची बदनामी झाली
खलिस्तानवाद्यांचा अमेरिकेतील भारतीय दूतावासावर हल्ला

सॅन फ्रॅन्सिस्को: खलिस्तानसमर्थकांनी अमेरिकेतील भारतीय दूतावासावर सोमवारी हल्ला केला.खलिस्तानच्यासमर्थनार्थ घोषणाबाजी करत त्यांनी भारतीय राष्ट्रध्वज उतरवून खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला.तो तिथल्या कर्मचाऱ्यांनी काढून टाकल्यानंतर संतप्त समर्थकांनी दूतावासाच्या दारे,खिडक्यांची तोडफोड केली. काही लोक सॅन फ्रॅन्सिस्कोमधील भारतीय दूतावासामध्ये पोलिसांचे सुरक्षाकडे भेदत घुसले. शीखनेते अजय भुतोरिया यांनी याहल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. ‘‘या हल्ल्यामुळे भारत आणि अमेरिकेतील राजकीय संबंध बिघडले जाऊ शकतात. या हल्ल्याने शांतताप्रिय शीख समाजाची बदनामी झाली आहे,’’ असे भुतोरिया म्हणाले. दरम्यान,लंडनमध्येही खलिस्तानवाद्यांनी भारतीय दूतावासावरील राष्ट्रध्वज काढून टाकल्याने तीव्र नाराजी पसरली आहे. 

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in