Kuwait Fire : भीषण आगीत ४९ जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये ४१ भारतीयांचाही समावेश, जयशंकर म्हणाले - 'धक्कादायक घटना'

कुवैतच्या दक्षिण अहमदी गव्हर्नरेटमधील मंगफ भागातील एका सहा मजली इमारतीतील स्वयंपाकघरात आग लागली आणि...
Kuwait Fire : भीषण आगीत ४९ जणांचा होरपळून मृत्यू; मृतांमध्ये ४१ भारतीयांचाही समावेश, जयशंकर म्हणाले - 'धक्कादायक घटना'
Published on

दक्षिण कुवैतमधील मंगफ शहरातील एका इमारतीला बुधवारी पहाटे भीषण आग लागली. एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ४९ लोकांचा मृत्यू झाला असून जवळपास ५० जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ४१ भारतीयांचा समावेश असून त्यापैकी ११ जण केरळचे रहिवासी आहेत, अशी माहिती समोर आली आहे. एकाच कंपनीत काम करणारे सुमारे १६० कामगार या इमारतीत राहत होते.

स्थानिक वेळेनुसार सकाळी ०६ः०० वाजता या घटनेची माहिती अधिकाऱ्यांना देण्यात आली, असं मेजर जनरल ईद रशीद हमाद यांनी सांगितलं. कुवैतच्या दक्षिण अहमदी गव्हर्नरेटमधील मंगफ भागातील एका सहा मजली इमारतीतील स्वयंपाकघरात आग लागल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. कुवैतच्या आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, आगीमुळे सुमारे ४३ लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी चार लोकांचा मृत्यू झालाय.

भारताचे परराष्ट्र मंत्री, डॉ. एस. जयशंकर यांनी सोशल मीडिया साइट X वर पोस्ट करून या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर म्हणाले की, “कुवैत शहरातील आगीच्या घटनेच्या वृत्तानं खूप धक्का बसला. 40 हून अधिक मृत्यू आणि 50 हून अधिक रूग्णालयात दाखल झाल्याची माहिती आहे. आपले राजदूत कॅम्पमध्ये गेले आहेत. आम्ही अधिक माहिती घेत आहोत. आपलं दूतावास या संदर्भात सर्व संबंधितांना सर्वतोपरी मदत करेल.”

logo
marathi.freepressjournal.in