चीनमध्ये भूस्खलन; ४० जण बेपत्ता

या दुर्घटनास्थळावरून ५०० जणांना बाहेर काढण्यात आले आहे.
चीनमध्ये भूस्खलन; ४० जण बेपत्ता

बीजिंग : चीनमधील युन्नान प्रांतात सोमवारी लियांगशुई गावात भूस्खलन झाले. यात दोघांचा मृत्यू झाला असून ४० जण बेपत्ता आहेत. सकाळी ५ वाजून ५१ वाजता ही घटना घडली आहे. या दुर्घटनास्थळावरून ५०० जणांना बाहेर काढण्यात आले आहे.

बचाव पथकाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, १८ घरांच्या खाली दबलेल्या ४७ जणांचा शोध घेतला जात आहे. अग्निशमन दलाच्या ३३ गाड्या व २०० कर्मचारी तैनात केले आहेत.

logo
marathi.freepressjournal.in