काश्मीरमधील कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत लश्कर ए तोयबाचा नेता हैदरसह दोन दहशतवादी ठार

काश्मीरमधील कुलगाममध्ये झालेल्या चकमकीत लश्कर ए तोयबाचा नेता हैदरसह दोन दहशतवादी ठार
Published on

काश्मीरमधील कुलगाम येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत लश्कर ए तोयबाचा नेता हैदरसह दोन दहशतवादी ठार झाले. या दोघांकडून सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभुमीवर भारतीय सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याची व्यापक मोहीम हाती घेतली आहे.

काश्मीरचे आयजी विजयकुमार यांनी सांगितले की, कुलगामच्या चीयान भागात रविवारी सकाळी दहशतवाद्यांशी चकमक झाली. यात दोन दहशतवादी मारले गेले आहेत. यापैकी एकाचे नाव हैदर आहे. तो पाकिस्तानचा रहिवासी असून लश्कर ए तोयबाचा कमांडर होता. दुसरा दहशतवादी स्थानिक असून शहबाज शाह असे त्याचे नाव आहे. तो कुलगामचा रहिवासी आहे. हैदर हा गेल्या दोन वर्षांपासून काश्मीरमध्ये सक्रीय होता. त्याचा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता.

logo
marathi.freepressjournal.in