

सिएटल : कुशल परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकेत काम करण्याची परवानगी देणाऱ्या एच-१बी व्हिसासाठी १ लाख डॉलर शुल्क आकारण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयाविरोधात विविध संघटना, उच्च शिक्षण व्यावसायिक आणि एका कर्मचारी एजन्सीने शुक्रवारी सॅन फ्रान्सिस्को येथील फेडरल कोर्टात खटला दाखल केला आहे.
एच-१बी व्हिसावर १ लाख डॉलर शुल्क आकारण्याचा निर्णय बेकायदेशीर असल्याचा दावा या खटल्यात करण्यात आला आहे. खटला दाखल करणाऱ्यांमध्ये जस्टिस ॲक्शन सेंटर, डेमोक्रसी फॉरवर्ड फाउंडेशन आणि साउथ एशियन अमेरिकन जस्टिस कोलॅबोरेटिव्ह यांचा समावेश आहे.