Lockdown Again : 'या' देशामध्ये लागला पुन्हा लॉकडाऊन, भारताची स्थिती काय ?

गेल्या 24 तासात कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात सुमारे 31 हजार रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली
Lockdown Again : 'या' देशामध्ये लागला पुन्हा लॉकडाऊन, भारताची स्थिती काय ?

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा (China Lockdown) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. चीनमधील झेंग्झौ शहरात जगातील सर्वात मोठा आयफोन कारखाना आहे, म्हणून झेंग्झौला आयफोन सिटी देखील म्हटले जाते. या शहरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. फॉक्सकॉन कारखान्यात बुधवारी हिंसक निदर्शने झाली. यावेळी पोलिस आणि हजारो कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. वेतन न मिळाल्याने कर्मचारी आक्रमक झाले होते. यानंतर प्रशासनाने या शहरात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमध्ये झेंग्झौ शहरासह अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, एका दिवसात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. चीनी प्रशासनाने पुन्हा एकदा शून्य कोविड धोरण स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. अनेक शहरांमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

बुधवारी, चीनमध्ये 31,454 नवीन रुग्ण आढळले, त्यापैकी 27,517 रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नव्हती. एकीकडे अनेक शहरांमध्ये लॉकडाऊनमुळे चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे विक्रमी रुग्ण आढळले आहेत. एका दिवसात सुमारे 31 हजार रुग्ण आढळल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पाच दिवस लॉकडाऊन जाहीर केला आहे. शुक्रवार ते मंगळवार लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. झेंग्झौ शहर प्रशासनाने नागरिकांना केवळ महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. अनेक शाळा, शॉपिंग मॉल्स बंद करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी प्रवेश करताना कोरोना चाचणी अहवाल असणे बंधनकारक आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in