वय फक्त 22, यूएस एअर फोर्सची लेफ्टनंट; आता बनली 'मिस अमेरिका', रचला इतिहास

15 जानेवारी रोजी तिला हा खिताब देऊन गौरविण्यात आले. मार्शने हा खिताब जिंकत इतिहास रचला आहे.
वय फक्त 22, यूएस एअर फोर्सची लेफ्टनंट; आता बनली 'मिस अमेरिका', रचला इतिहास
Published on
अमेरिकन हवाई दलातील सेकंड लेफ्टनंट मॅडिसन मार्शने मिस अमेरिका स्पर्धा जिंकली आहे. सोमवार,15 जानेवारी रोजी तिला हा खिताब देऊन गौरविण्यात आले. मार्शने हा खिताब जिंकत इतिहास रचला आहे.

यूएस एअर फोर्स अकादमीमधून पदवी घेतल्यानंतर काही महिन्यांनी, मॅडिसनने मिस अमेरिका या सौंदर्य स्पर्धेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

22 वर्षीय मॅडिसन मार्श हिची 2023 मध्ये अमेरिकन हवाई दलात सेकंड लेफ्टनंट म्हणून नियुक्ती झाली. याआधी तिने मिस कोलोरॅडोचा खिताबही जिंकला होता.

टेक्सासची एली ब्रॉक्स मिस अमेरिका स्पर्धेतही मॅडिसन मार्श पहिली उपविजेती ठरली. या स्पर्धेमध्ये सर्व 50 यूएस राज्यांचे तसेच कोलंबिया जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारे 51 स्पर्धक होते.

US वायुसेनेने मार्शच्या यशाचा आनंद साजरा केला, कर्तव्यावर परतल्यानंतर तिचे स्वागत केलं गेलं आणि सोशल मीडियावर मिस अमेरिका 2024 चे विजेतेपद जिंकल्याची घोषणा केली.

मार्श आर्कान्सा येथील रहीवासी आहे. तिने 11 स्पर्धकांसह अंतिम फेरी गाठण्यासाठी सलग तीन रात्री चाललेल्या प्राथमिक स्पर्धा प्रक्रियेतून पुढे गेली.

स्पर्धेतील चर्चेच्या  फेरीदरम्यान, मार्शने तिच्या आईच्या स्वादुपिंड कर्करोगाच्या लढाईची कहाणी सर्वासमोर मांडली. मार्शने एका फाउंडेशनची स्थापना केली असुन हे फाउंडेशन कर्करोगाच्या संशोधनासाठी पैसे गोळा करते.

''आधी महिला पायलट आणि आता मिस अमेरिका या दोन्ही गोष्टी एकत्र साध्य करणे माझ्यासाठी एक अद्भूत अनुभव आहे. यामुळे तुम्ही स्वतःला मर्यादित ठेवण्याची गरज नाही हे इतरांना समजेल अशी अपेक्षा आहे'', असे मार्श एका मुलाखतीत म्हणाली.

मिस अमेरिका स्पर्धा जिंकणारी मॅडिसन मार्श ही पहिली यूएस एअर फोर्स ऑफिसर आहे, जीने आपल्या कर्तव्यावर सक्रिय राहुन मिस अमेरिका स्पर्धेचा मुकूट जिंकला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in