पाकिस्तानात 'हजारा एक्स्प्रेस'ला मोठा अपघात ; आठ डबे रुळावरुन घसरल्याने 15 प्रवासी ठार तर ५० जखमी

कराचीहून अबोटाबादला जात असताना सहारा रेल्वे स्थानकाजवळ हजारा एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरुन घसरल्याने हा अपघात झाला.
पाकिस्तानात 'हजारा एक्स्प्रेस'ला मोठा अपघात ; आठ डबे रुळावरुन घसरल्याने 15 प्रवासी ठार तर ५० जखमी

पाकिस्तानात हजारा एक्स्प्रेसला मोठा अपघात झाल्याची घटना घडली आहे. रावळपिंडीतूनहून जाणारी हजारा एक्सप्रेस रुळावरुन घसरल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अपघाता आतापर्यंत १५ लोकांनी आपले प्राण गमावले असून ५० जण जखमी झाले आहेत. कराचीहून अबोटाबादला जात असताना सहारा रेल्वे स्थानकाजवळ हजारा एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरुन घसरल्याने हा अपघात झाला.

दरम्यान, सहारा रेल्वे स्टेशन शहजादपूर आणि नवाबशहा दरम्यान आहे. या अपघातात अनेक प्रवासी अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलीस घटनास्थळी पोहचले असून बचाव कार्य सुरु करण्यात आलं आहे. गाडी रुळावरुन कोणत्या कारणाने घसरली याबाबत माहिती मिळू शकली नाही.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक देखील घटनास्थळी दाखल झाले असून अपघात ग्रस्तांना मदत कार्य सुर केलं आहे. ट्रेन रुळावरुन घसरल्याने डबे उलटे झाले. या डब्यातून लोक बाहेर पडताना दिसत आहे. यात त्यांना स्थानिकांची मदत होत आहे. दरम्यान हजारा एक्स्प्रेस कराचीहून अबोटाबाद जात असताना सहारा रेल्वे स्थानकाजवळ ट्रेनचे आठ डबे रुळावरुन घसरल्याची माहिती रेल्वे अधिकारी मोहसीन सियाल यांनी एचयूएम न्यूजला दिली आहे. तर या दुर्घटनेत जखमी प्रवाशांना उपचारासाठी नवाबशाह येथील पीपल्स मेडिकल हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत असल्याचं वृत्त जिओ टीव्हीने दिलं आहे.

logo
marathi.freepressjournal.in