थायलंडमध्ये मॉलमध्ये गोळीबार: ४ ठार

गोळीबारानंतर पोलिसांनी एका संशयित बंदुकधारी इसमाला अटक केली आहे.
थायलंडमध्ये मॉलमध्ये गोळीबार: ४ ठार

बँकॉक : येथील लक्झरी मॉलमध्ये झालेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे, तर तीन जण जखमी झाले आहेत. गोळीबारानंतर पोलिसांनी एका संशयित बंदुकधारी इसमाला अटक केली आहे. ही घटना सियाम पैरागो येथे घडली. मॉलमध्ये गोळ्यांचा आवाज येऊ लागल्यानंतर गोंधळ माजला. लोक सैरावैरा धावू लागले. यावेळी मॉलमध्ये शेकडो लोक उपस्थित होते. मॉलमध्ये गोळीबाराची घटना घडल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

logo
marathi.freepressjournal.in