मरियम नवाझ पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री

पन्नास वर्षीय मरियम या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाच्या नेत्या आहेत.
मरियम नवाझ पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांची कन्या मरियम नवाझ या पाकिस्तानमधील पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत. पन्नास वर्षीय मरियम या पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझ (पीएमएल-एन) पक्षाच्या नेत्या आहेत. त्यांचे काका शहबाज शरीफ यापूर्वी पाकिस्तानचे पंतप्रधान होते आणि देशात ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीनंतर पुन्हा पंतप्रधान बनण्याची शक्यता आहे. नवाझ आणि शहबाज यांच्या उपस्थितीत मरियम यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण केली. दरम्यान, पाकिस्तानमध्ये मार्च महिन्यात होऊ घातलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाने बॅरिस्टर गोहर खान यांचे नामांकन केले आहे. यापूर्वी त्यांनी बॅरिस्टर अली झफर यांचे नाव जाहीर केले होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in