मसूद अझरचे कुटुंब ठार झाल्याची ‘जैश’ची कबुली

भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दहशतवादी मौलाना मसूद अझरचे कुटुंबीय ठार झाले, अशी कबुली ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने दिली.
मसूद अझरचे कुटुंब ठार  झाल्याची ‘जैश’ची कबुली
Photo : X
Published on

इस्लामाबाद : भारताने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’मध्ये दहशतवादी मौलाना मसूद अझरचे कुटुंबीय ठार झाले, अशी कबुली ‘जैश-ए-मोहम्मद’ या दहशतवादी संघटनेने दिली.

‘जैश’चा कमांडर मसूद इलियास काश्मिरीचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात तो म्हणतो की, ७ मे रोजी बहावलपूर येथे भारताच्या कारवाईत अझरच्या कुटुंबाचे तुकडे तुकडे झाले.

बहावलपूर येथील भारतीय हल्ल्यात मसूदच्या कुटुंबातील १० जण मारले गेले होते. तसेच ४ दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. या हल्ल्याच्या वेळी मसूद तेथे नसल्याने त्याचे प्राण वाचले.

logo
marathi.freepressjournal.in