पाकिस्तानमध्ये लष्करी तळावर भीषण स्फोट

पाकिस्तानमध्ये लष्करी तळावर भीषण स्फोट

एकीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धसंघर्ष संपलेला नाही. या युद्धामुळे युक्रेनमधील लाखो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. आता पाकिस्तानमधील सियालकोट येथे लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.

पाकिस्तानमधील सियालकोटमधील लष्कराच्या ताब्यात असलेल्या भागात अनेक स्फोट झाले आहेत. सुरुवातीला एक स्फोट झाल्यानंतर लागोपाठ स्फोटांची मालिकाच या भागात पाहायला मिळाली. पाकिस्तानी लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या या ठिकाणी दारुगोळा ठेवण्यात आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या स्फोटात अद्याप कोणताही जीवितहानी झालेली नाही. मात्र पाकिस्तानी लष्करानेही या स्फोटाला दुजोरा दिला आहे. “सियालकोट येथील लष्करी तळावर मोठा स्फोट झाला आहे. दारूगोळा ठेवलेल्या ठिकाणी हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. स्फोटानंतर या भागात मोठ्या प्रमाणात आग लागली असून स्फोटाचे नेमके कारण समोर आलेले नाही,” असे वृत्त ‘डेली मेल’ या प्रसिद्धीमाध्यमाने दिले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in