जोहान्सबर्गमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग ; 63 जणांचा होरपळून मृत्यू , ४० जण गंभीर जखमी

आग लागलेल्या इमारतीचा वापर घर नसलेल्यांसाठी अनधिकृत निवास म्हणून केला जात होता.
जोहान्सबर्गमध्ये बहुमजली इमारतीला भीषण आग ; 63 जणांचा होरपळून मृत्यू , ४० जण गंभीर जखमी

दक्षिण अफ्रिकेच्या जोहान्सबर्ग येथील एका बहुमजली इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत ६३ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ४० हून अधिक लोक गंभीररित्या भाजले आहेत. ही आग गुरुवारी सकाळच्या सुमारास लागली आहे. आग लागलेली इमारत ही शहराच्या मध्यवर्ती असलेल्या व्यापारी भागात आहेत. अग्नीशमन दलाने आतापर्यंत ६३ मृतदेह बाहेर काढले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान बचावकार्यत सक्रिय झाले आहेत. या घटनेत६३ जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग लागलेल्या इमारतीचा वापर घर नसलेल्यांसाठी अनधिकृत निवास म्हणून केला जात होता. तसंच या इमारतीसाठी कसल्याही प्रकारचा अधिकृत भाडे करारही झालेला नव्हता. या इमरातीत एवढे लोक एकत्रितपणे राहत असल्याने बचावकार्यात समस्या येत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

प्रत्यक्षदर्शी लोकांच्या म्हण्यानुसार या इमारतीत २०० पेक्षा जास्त लोक असल्याची शक्यता आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली ? याबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. अग्निशमन दलाच्या जवांनी शर्थीच्या प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in