मसूद पजश्कियान इराणचे राष्ट्रपती

इराणमध्ये मसूद पजश्कियान देशाचे ९ वे राष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी कट्टरतावादी नेते सईद जलिली यांचा ३० लाखांहून अधिक मतांनी पराभव केला.
मसूद पजश्कियान इराणचे राष्ट्रपती
Published on

दुबई : इराणमध्ये मसूद पजश्कियान देशाचे ९ वे राष्ट्रपती बनले आहेत. त्यांनी कट्टरतावादी नेते सईद जलिली यांचा ३० लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. इराणमध्ये शुक्रवारी (५ जुलै) दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. यामध्ये सुमारे ३ कोटी लोकांनी मतदान केले.

इराणच्या राज्य माध्यमानुसार, पजश्कियान यांना १६.४ दशलक्ष मते मिळाली, तर जलिली यांना १३.६ दशलक्ष मते मिळाली. ५ जुलै रोजी १६ तास चाललेल्या मतदानात देशातील जवळपास ३ कोटींहून अधिक लोकांनी मतदान केले.

अधिकृत वेळेनुसार, सायंकाळी ६ वाजता मतदान संपणार होते. १९ मे रोजी इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. यानंतर देशात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुका जाहीर झाल्या. यापूर्वी इराणमध्ये या वर्षी फेब्रुवारीमध्ये निवडणूक झाली होती, ज्यामध्ये रायसी पुन्हा देशाचे राष्ट्राध्यक्ष बनले होते.

पहिल्या टप्प्यात कोणालाही बहुमत

मिळाले नाही. इराणमध्ये २८ मे रोजी पहिल्या टप्यातील मतदान झाले. यामध्ये एकाही उमेदवाराला बहुमताचा आकडा पार करता आला नाही. तथापि, पजश्कियान ४२.५ टक्के मतांसह प्रथम आणि जलिली ३८.८ टक्के मतांसह दुसऱ्या स्थानावर आले.

मसूद पजश्कियान हिजाबला विरोध करतात. ताब्रिझचे खासदार पजश्कियान यांना सर्वात संयमी नेता म्हणून ओळखले जाते. इराणी मीडिया इराण वायरच्या मते, लोक पजश्कियानकडे सुधारणावादी म्हणून पाहत आहेत. ते माजी राष्ट्राध्यक्ष हसन रुहानी यांचे निकटवर्तीय मानले जातात.

पजश्कियान हे माजी सर्जन असून सध्या देशाचे आरोग्य मंत्री आहेत. त्यांनी अनेकवेळा वादविवादांमध्ये हिजाबला विरोध केला आहे. नैतिक पोलिसिंग करण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. पजश्कियान २००६ मध्ये ताब्रिझमधून पहिल्यांदा खासदार झाले. ते अमेरिकेला आपला शत्रू मानतात.

logo
marathi.freepressjournal.in