मायक्रोसॉ‌फ्टने ३० वर्षांनंतर कीबोर्ड बदलला; एआयमुळे केले बदल

मायक्रोसॉफ्टने ॲँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी नवीन ‘को पायलट ॲॅप’ सुरू केले आहे. या ॲॅपच्या माध्यमातून ‘एआय चॅटबॉट’ला नवीन सेवेच्या रूपात वापर करू शकतात.
मायक्रोसॉ‌फ्टने ३० वर्षांनंतर कीबोर्ड बदलला; एआयमुळे केले बदल

सॅनफ्रान्सिस्को : जगातील मोठी तंत्रज्ञान कंपनी मायक्रोसॉफ्टने ३० वर्षांनंतर लॅपटॉप व पीसीच्या कीबोर्डमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यांनी एआय चॅटबॉट ‘को पायलट’ कीबोर्डमध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे ग्राहकांना चांगला अनुभव मिळणार आहे.

मायक्रोसॉफ्टने ‘को पायलट की’ला ‘विंडोज की’ला स्थान दिले आहे. आता हे बटण ‘ऑल्ट की’च्या बाजूला असेल. नवीन बटणाला ‘को पायलट’चा लोगो लावलेला आहे. सध्या ही सुविधा मायक्रोसॉफ्ट विंडोज ११ ऑपरेटिंग सिस्टम चालणाऱ्या काही ठरावीक पसर्नल कॉम्प्युटरवर मिळेल. मायक्रोसॉफ्टने १९९४ मध्ये विंडोज स्टार्ट की तयार केली होती. त्यानंतर कंपनीने की बोर्डच्या लेआऊटमध्ये बदल केले आहेत.

जर एखाद्या देशात विंडोज को पायलट उपलब्ध नसेल तर त्याऐवजी विंडोज सर्च आणले जाईल. ‘विंडोज की’तून स्टार्ट मेन्यू उघडतो.

विंडोज ११ च्या कीबोर्डमध्ये या नवीन ‘को पायलट’ बटणला सीईएस टेक्नॉलॉजी कॉन्फरन्समध्ये सादर केले जाईल. मायक्रोसॉफ्ट यासाठी चॅट जीपीटी बनवणारी कंपनी ‘ओपन-आय’सोबत काम करेल.

मायक्रोसॉफ्टने ॲँड्रॉईड वापरकर्त्यांसाठी नवीन ‘को पायलट ॲॅप’ सुरू केले आहे. या ॲॅपच्या माध्यमातून ‘एआय चॅटबॉट’ला नवीन सेवेच्या रूपात वापर करू शकतात. हे ॲॅप सर्च इंजिन ‘बिंग’पेक्षा वेगळा आहे. ते मायक्रोसॉफ्टच्या ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in