टॅरिफचा फटका बसल्याने मोदींचा पुतिन यांना फोन; नाटोप्रमुख मार्क रूट यांचा दावा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा परिणाम म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांच्याकडे युक्रेन युद्धाबाबतचे स्पष्टीकरण मागितले, असा दावा नाटोचे प्रमुख मार्क रूट यांनी केला आहे.
टॅरिफचा फटका बसल्याने मोदींचा पुतिन यांना फोन; नाटोप्रमुख मार्क रूट यांचा दावा
टॅरिफचा फटका बसल्याने मोदींचा पुतिन यांना फोन; नाटोप्रमुख मार्क रूट यांचा दावा
Published on

नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या टॅरिफचा परिणाम म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि त्यांच्याकडे युक्रेन युद्धाबाबतचे स्पष्टीकरण मागितले, असा दावा नाटोचे प्रमुख मार्क रूट यांनी केला आहे.

ट्रम्प यांनी भारतातून आयात केल्या जाणाऱ्या मालावर ५० टक्के टॅरिफ लादला आहे. न्यू यॉर्कमधील यूएन सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर एका वृत्तवाहिनीला रूट यांनी सांगितले की, भारत सरकारचे पुतिन यांच्याशी फोनवर बोलणे सुरू आहे आणि नरेंद्र मोदी त्यांना युक्रेनबाबतच्या त्यांच्या धोरणावर स्पष्टीकरण मागत आहेत, कारण भारताला टॅरिफचा फटका बसत आहे.

भारताकडून खंडन

दरम्यान, भारताने रशियाकडे युक्रेन युद्ध धोरणाबाबत स्पष्टीकरण मागितल्याचा नाटोचे सरचिटणीस मार्क रुट यांनी केलेला दावा पूर्णपणे निराधार आहे. भारत आणि रशियामध्ये अशी कोणतीही चर्चा झाली नाही, असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. याचबरोबर, असे दावे करण्यापूर्वी नाटो प्रमुखांनी भविष्यात सावधगिरी बाळगावी, असेही म्हटले आहे.

logo
marathi.freepressjournal.in