अफगाणिस्तानात मोरोक्कोच्या विमानाला अपघात; सहा जणांचा विमानात समावेश, चार्टर रुग्णवाहिका म्हणून होत होता वापर

तालिबानच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांच्या वेगळ्या तालिबानी निवेदनात विमान मोरोक्कन कंपनीचे असल्याचे म्हटले आहे.
अफगाणिस्तानात मोरोक्कोच्या विमानाला अपघात; सहा जणांचा विमानात समावेश, चार्टर रुग्णवाहिका म्हणून होत होता वापर

इस्लामाबाद : सहा जणांना घेऊन जाणारे एक मोरोक्कन खासगी विमान अफगाणिस्तानच्या दुर्गम ग्रामीण भागात कोसळल्याचे अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. हे विमान भारतातील गया येथून ताश्कंद, उझबेकिस्तान, पुढे मॉस्कोमधील झुकोव्स्की आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतच्या मार्गावर चार्टर रुग्णवाहिका उड्डाण म्हणून कार्यरत होते.

बदख्शान प्रांतातील झेबाक जिल्ह्याजवळील डोंगराळ भागात शनिवारी हा अपघात झाला. प्रादेशिक प्रवक्ता जबिहुल्ला अमिरी यांनी सांगितले की, या भागात बचाव पथक पाठवण्यात आले आहे. झेबाक हे अफगाणिस्तानची राजधानी, काबूलच्या ईशान्येस सुमारे २५० किलोमीटर अंतरावर आहे. तो एक ग्रामीण, डोंगराळ भाग आहे, तेथे लोकसंख्याही काही हजारावर आहे.

बदख्शान पोलीस प्रमुखांच्या कार्यालयानेही अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मॉस्कोमध्ये रशियन नागरी उड्डाण प्राधिकरणाने सांगितले की डसॉल्ट फाल्कन १० हे विमान चार क्रू सदस्य आणि दोन प्रवाशांसह बेपत्ता झाले. रशियन-नोंदणीकृत विमानाने संदेशवहन करणे थांबवले आणि रडार स्क्रीनवरून गायब झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यात थायलंडच्या यू-तापाओ-रायोंग-पट्टाया आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण सुरू असल्याचे वर्णन केले आहे. हे विमान ॲथलेटिक ग्रुप एलएलसी आणि एका खासगी व्यक्तीचे असल्याचे रशियन अधिकाऱ्यांनी सांगितले. हे फाल्कन १० विमान १९७८ मध्ये बांधले गेले होते, असेही ते म्हणाले.

तालिबानच्या माहिती आणि संस्कृती मंत्रालयाचे प्रवक्ते अब्दुल वाहिद रायन यांच्या वेगळ्या तालिबानी निवेदनात विमान मोरोक्कन कंपनीचे असल्याचे म्हटले आहे. भारतीय नागरी उड्डाण अधिकाऱ्यांनी त्याचप्रमाणे विमानाचे वर्णन मोरोक्कन नोंदणीकृत असल्याचे सांगितले. रेयानने तपशील न सांगता अपघातामागे त्याच्या इंजिनाचा दोष असल्याचा दावा केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in