Morocco Earthquake: ६.८ रिश्टर स्केलच्या भूकंपात आतापर्यंत ६३२ जणांचा मृत्यृ, तर ३२९ जखमी

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेशच्या ७१ किमी दक्षिण पश्चिमेस तर १८.५ किमी खोलीवर उच्च अॅटलस पर्वतांमध्ये होता
Morocco Earthquake: ६.८ रिश्टर स्केलच्या  भूकंपात आतापर्यंत ६३२ जणांचा मृत्यृ, तर ३२९ जखमी
Published on

मध्य मोरोक्कोमध्ये शक्तिशाली भूकंप झाल्याने मोठी जीवित तसंच वित्तहानी झाली आहे. ६.८ रिश्टर स्केलच्या या भूकंपात मृतांची संख्या ६३२वर पोहचली आहे. तर यात ३२९ जण जखमी झाले आहेत. सरकारी टिव्हीने शनिवारी याबाबतची माहिती दिली आहे. मोरोक्कोच्या गृह मंत्रालयाने एका निवेदन जारी करत त्यात अल-हौज, माराकेश, ओअरझाझेट, अझीलाल, चिचौआ आणि तारौदांत प्रांत आणि नगरपालिकांमधून मृत्यूची नोंद झाल्याचं म्हटलं आहे.

हायअटलस पर्वतावर भूकंपाचे केंद्र

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू माराकेशच्या ७१ किमी दक्षिण पश्चिमेस तर १८.५ किमी खोलीवर उच्च अॅटलस पर्वतांमध्ये होता, बीबीसीने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

राजधानीत राबाटमध्येही जाणवले भूकंपाचे धक्के

राजधानी राबाटमध्येही हे भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री ११.११ वाजता भूकंपाचा धक्का बसला. याबाबतचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील व्हिडिओंमध्ये लोक रस्त्यांवर पळताता दिसत आहेत. भूकंपामुळे पडलेल्या इमारती, तसंच ढिगाऱ्यांवरुन पळ काढताना हे लोक दिसत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in