शक्तिशाली रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट; स्टारशिपचे आकाशात झाले तुकडे

जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट झाला आहे. सायंकाळी ७ च्या सुमारास टेक्सासच्या बोका चिकाहून त्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते.
शक्तिशाली रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट; स्टारशिपचे आकाशात झाले तुकडे

जगातील सर्वात शक्तिशाली रॉकेटचा प्रक्षेपणानंतर स्फोट झाला आहे. सायंकाळी ७ च्या सुमारास टेक्सासच्या बोका चिकाहून त्याचे प्रक्षेपण करण्यात आले होते. जगातील सर्वात ताकदवान लाँच व्हेईकल ‘स्टारशिप’ आपल्या ऑर्बिटल टेस्टसाठी सज्ज होते. हा स्टारशिपच्या ऑर्बिटल लाँचिंगचा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात प्रेशर व्हॉल्व फ्रीज झाल्यामुळे अवघ्या ३९ सेकंद अगोदर प्रक्षेपण थांबवण्यात आले होते.

स्टेनलेस स्टीलचे स्टारशिप जगातील दुसरे सर्वात श्रीमंत उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीने तयार केले आहे. हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वपूर्ण होते. कारण, केवळ हेच अंतराळयान मानवाला आंतरग्रहीय म्हणजे इंटरप्लॅनेटरी बनवू शकणार आहे. ‘स्टारशिप’च्या मदतीने प्रथमच माणूस पृथ्वीशिवाय अन्य ग्रहावर पाऊल ठेवेल. मस्क यांची २०२९ पर्यंत मंगळ ग्रहावर मानवी वस्ती स्थापन करण्याची महत्त्वाकांक्षा आहे. हे स्पेसशिप माणसांना एका तासापेक्षा कमी वेळेत जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात पोहोचवण्यास सक्षम असेल. स्पेसएक्सच्या स्टारशिप स्पेसक्राफ्ट व सुपर हेवी रॉकेटला कलेक्टिव्हली ‘स्टारशिप’ म्हटले जाते. ही एक रियुजेबल ट्रान्सपोर्टेशन सिस्टम आहे. या रॉकेटची १०० लोकांना एकाचवेळी मंगळ ग्रहावर घेऊन जाण्याची क्षमता आहे.

logo
marathi.freepressjournal.in