लाल समुद्रात तेल वाहून नेणाऱ्या जहाजावर हुथी बंडखोरांकडून ड्रोन हल्ला; 25 भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित

येमेनच्या हुथी बंडखोरांने ड्रोन हल्ला केलेले एमव्ही साईबाबा हे भारतीय ध्वज असलेले क्रूड ऑइल टँक असल्याचे म्हटले होते. परंतु भारतीय नौदलाने  ते नाकारले आहे. एमव्ही साईबाबा हे जहाज गॅबनच्या मालकीचे असून ते भारतीय ध्वज असलेले जहाज नव्हते,  असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.  
फोटो -  X/@CENTCOM
फोटो - X/@CENTCOM

लाल समुद्रात गॅबन ध्वज असलेल्या तेल वाहून नेणाऱ्या एमव्ही साईबाबा जहाजावर ड्रोन हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. येमेनच्या हुथी बंडखोरांकडून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. यावेळी जहाजावर 25 भारतीय क्रू मेंबर्स उपस्थित होते. हे सर्व भारतीय क्रू मेंबर्स सुरक्षित असल्याची माहिती भारतीय नौदलाने दिली आहे.

यापूर्वी, US सेंट्रल कमांडने  (CENTCOM) दिलेल्या माहितीनुसार, येमेनच्या हुथी बंडखोरांने ड्रोन हल्ला केलेले एमव्ही साईबाबा हे भारतीय ध्वज असलेले क्रूड ऑइल टँक असल्याचे म्हटले होते. परंतु भारतीय नौदलाने  ते नाकारले आहे. एमव्ही साईबाबा हे जहाज गॅबनच्या मालकीचे असून ते भारतीय ध्वज असलेले जहाज नव्हते,  असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

 US सेंट्रल कमांडला मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री 8 वाजता (येमेन वेळ) या हल्ल्यात कोणालाही दुखापत झालेली नाही. CENTCOM ने सांगितले की,  अमेरिकेच्या लॅबून या युद्धनौकेने ड्रोन हल्ल्याच्या संकटाच्या आवाहनाला प्रतिसाद दिला.

या हल्ल्यात आणखी एक रासायनिक/तेल वाहून नेणारे  नॉर्वेजियन ध्वज असलेले एमव्ही ब्लामनेन जहाज वाचले. या जहाजाने  हौथी ड्रोन अ‍ॅटॅक चुकवला असून यात कोणालाही इजा तसेच नुकसान झाले नसल्याची माहिती  सेंटकॉमने दिली. तसेच दक्षिण लाल समुद्रात येमेनच्या हुथीद्वारे सोडलेले यूएसकडे जाणारे चार ड्रोन हल्ले यूएस सैन्याने हाणून पाडल्याचेही सेंटकॉमने सांगितले.  

 17 ऑक्टोबरपासून हुथी अतिरेक्यांकडून लाल समुद्रातील व्यावसायिक जहाजांवर होणारा हा 14 आणि 15 वा हल्ला असल्याची माहिती सेंटकॉमने X वर दिली आहे.

 दरम्यान, काल गुजरातच्या किनाऱ्यावरील वेरावल येथून नैऋत्येला अरबी समुद्रात सुमारे  २०० सागरी मैलावर शनिवारी इस्रायलशी संबंधित एका तेलवाहू जहाजावर ड्रोन हल्ला झाला होता. यावेळी जहाजावर 20 भारतीय कर्मचारी उपस्थित होते. हल्ला झाल्यानंतर जहाजाला लागलेली आग तात्काळ विझवण्यात आल्याने यापैकी कोणालाही इजा झाली नाही.  यानंतर भारतीय नौदल आणि तटरक्षक दल सक्रिय झाले होते. नौदलाने तात्काळ आपल्या नौका घटनास्थळी रवाना केल्या होत्या.

logo
marathi.freepressjournal.in