Video : तब्बल ९ महिन्यांनी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या; १७ तासांच्या प्रवासानंतर फ्लोरिडाच्या समुद्रात 'ड्रॅगन'चं लँडिंग

अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अखेर तब्बल ९ महिने आणि १४ दिवसांनी सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या.
Video : तब्बल ९ महिन्यांनी सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्या; १७ तासांच्या प्रवासानंतर फ्लोरिडाच्या समुद्रात 'ड्रॅगन'चं लँडिंग
Published on

अंतराळात अडकलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स या अखेर तब्बल ९ महिने आणि १४ दिवसांनी सुरक्षितपणे पृथ्वीवर परतल्या.

इलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स कंपनीच्या ड्रॅगन अंतराळयानाद्वारे १७ तासांच्या प्रवासानंतर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीवर सुखरूप पोहोचले. या दरम्यान सुमारे ७ मिनिटांसाठी यानासोबतचा संपर्क देखील तुटला होता, कम्युनिकेशन ब्लॅकआउट झाले होते. पण सुदैवाने थोड्याच वेळात पुन्हा संपर्क झाला. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांच्यासोबत अन्य दोन अंतराळवीर देखील परत आले आहेत. भारतीय प्रमाण वेळेनुसार १९ मार्च रोजी पहाटे ३.२७ वाजता, ड्रॅगन अंतराळयानाच्या कॅप्सूलने फ्लोरिडाच्या किनाऱ्याजवळील समुद्रात यशस्वी 'स्प्लॅशडाउन' केले.

सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांनी ५ जून २०२४ रोजी अंतराळ स्थानकाकडे उड्डाण केलं होतं. त्यांची ही मोहिम केवळ आठवडाभराची होती. मात्र, त्यांच्या स्टारलायनर या अंतराळयानातून हेलियम गॅसची गळती आणि थ्रस्टर्समध्ये निर्माण झालेल्या अडचणी यामुळे त्यांना तब्बल ९ महिने अंतराळ स्थानकावर थांबावे लागले. कॅप्सूलमधून बाहेर आल्यानंतर सुनीता विल्यम्स यांनी स्मीत हास्य करीत सर्वांचे अभिवादन केले.

नासाने या घटनेचे व्हिडिओ शेअर केले आहेत. सोशल मीडियावरही अनेक फोटो-व्हिडिओ व्हायरल झाले असून वेलकम बॅक म्हणत सुनीता विल्यम्स सुखरुप परतल्याबदद्ल नेटकरी आनंद व्यक्त करीत आहेत.

logo
marathi.freepressjournal.in