नवाझ शरीफ चार वर्षांनी पाकिस्तानात दाखल

२०१९ मध्ये नवाझ शरीफ हे आजारी असल्याच्या नावावर लंडनला गेले होते
नवाझ शरीफ चार वर्षांनी पाकिस्तानात दाखल

इस्लामाबाद : गेली चार वर्षे देशाबाहेर राहणारे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ हे मायदेशी दाखल झाले आहेत. मायदेशात आल्या आल्या त्यांनी ‘पाकिस्तानात अराजक माजले आहे,’ अशी टीका केली आहे. माझा ‘पीएमएल-एन’ पक्ष देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

२०१९ मध्ये नवाझ शरीफ हे आजारी असल्याच्या नावावर लंडनला गेले होते. माजी अर्थमंत्री इशाक दार म्हणाले की, नवाझ शरीफ चार्टर्ड विमानाने दुबईतून इस्लामाबादला दाखल झाले. दुबई विमानतळावर पत्रकारांशी बोलताना शरीफ म्हणाले की, २०१७ च्या तुलनेत पाकिस्तानातील परिस्थिती अत्यंत खराब आहे. माझा देश पुढे जाण्याऐवजी मागे जात आहे. देशाची परिस्थिती अशी का झाली, याचा विचार करणे गरजेचे आहे,’ असे ते म्हणाले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in