लाहोर - आपल्या राजकीय विरोधकांकडून लष्करी आस्थापनेचा 'लाडला' म्हणून ओळखल्या गेल्याने चिडलेल्या पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पीएमएल-एनचे सुप्रीमो नवाझ शरीफ यांनी नियोजित सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी या 'लाडला' समस्येचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांच्या पक्षाच्या नवीन जाहीरनामा समितीला दिले आहेत. फेब्रुवारीमध्ये या निवडणुका होत आहेत.
७३ वर्षीय नवाझ शरिफ हे चार वर्षांच्या विजनवासानंतर २१ ऑक्टोबर रोजी लंडनमधून पाकिस्तानला परतले. ते नियोजित निवडणुकीदरम्यान त्यांच्या पक्षाचे नेतृत्व करण्यास तयार आहेत. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी होणार आहे.
पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) यांनी या संबंधातील लाडला हे विशेषण नवाझ शरिफ यांना लावले आहे. त्यामुळे शरिफ हे नाराज अाहेत. तशात आता न्यायालयांकडून क्लीन चिट मिळवून पुन्हा ज्यासाठी त्यांना अपात्र ठरविले गेले होते, त्या प्रकरमआंतही निर्दोष ठरून ते पुन्हा सत्तेवर येण्यासाठी प्रयत्नशील झाले आहेत, असे डॉन वृत्तपत्राने पीएमएल- एन मधील अंतस्थ सूत्रांचा हवाला देत म्हटले आहे.
शरीफ हे एकमेव पाकिस्तानी राजकारणी आहेत जे तीनवेळ ादेशाचे पंतप्रधान बनले होते. त्यांनी पक्षाच्या ४० हून अधिक सदस्य असलेल्या नवीन जाहीरनामा समितीला "प्रतिष्ठापनेचा पक्ष" असण्याच्या या छापाला विरोध करण्यासाठी आणि लाडला टॅग" हे विशेषण पुसूनटाकण्यासाठी त्यादृष्टीने तसे काम करम्यास सांगितले आहे, अशी माहिती त्यांच्या पक्षाच्या अंतस्थ सूत्रांनी दिली. नावाझ शरिफ यांच्या पीएमएल - एन पक्षाने शनिवारी पक्षांत ३० उपसमित्यांची स्थापना केली.तसेच २० नोव्हेंबरपर्यंत जाहिरनामा करण्यासाठी शिफारशी करम्यासही सांगण्यात आले आहे.