प्रवासी बस थेट नदीत कोसळली; १८ जणांचा मृत्यू; अनेक जखमी, नेपाळमध्ये भीषण अपघात, बचावकार्य सुरू

नेपाळमध्ये सोमवारी पहाटे प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला. पोखराहून काठमांडूकडे जाणारी बस थेट त्रिशूली नदीत कोसळली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी अतिवेगामुळे ही दुर्घटना...
प्रवासी बस थेट नदीत कोसळली; १८ जणांचा मृत्यू; अनेक जखमी, नेपाळमध्ये भीषण अपघात, बचावकार्य सुरू
प्रवासी बस थेट नदीत कोसळली; १८ जणांचा मृत्यू; अनेक जखमी, नेपाळमध्ये भीषण अपघात, बचावकार्य सुरू
Published on

नेपाळमध्ये सोमवारी पहाटे प्रवाशांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला. धादिंग जिल्ह्यातील गजुरीजवळ बस थेट त्रिशूली नदीत कोसळल्याने किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

ही दुर्घटना पहाटे सुमारे १.३० वाजेच्या सुमारास घडली. पोखराहून काठमांडूकडे ही बस जात होती. बस पृथ्वी महामार्गावरून जात असताना, काठमांडूपासून सुमारे ९० किमी अंतरावर असलेल्या गजुरी परिसरात त्रिशूली नदीत कोसळली, अशी माहिती सशस्त्र पोलीस दलाचे प्रवक्ते बिष्णू प्रसाद भट्टा यांनी दिली.

१७ मृतदेह बाहेर काढले; २८ जखमी, मृत-जखमींमध्ये परदेशी नागरिक

अपघातस्थळावरून आतापर्यंत १७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. २८ जखमी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले असून त्यांना विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये न्यूझीलंडचा एक पुरुष प्रवासी असल्याची माहिती मिळाली आहे. तर जखमींमध्ये जपान आणि नेदरलँड्सच्या प्रत्येकी एका महिला प्रवाशांचा समावेश आहे.

बचावकार्यात अडचणी

नेपाळ सेना, सशस्त्र पोलीस दल आणि नेपाळ पोलीस यांच्या पथकांकडून संयुक्तपणे बचावकार्य सुरू आहे. अपघातस्थळावरील दृश्यांमध्ये बसचा पूर्णपणे चुराडा झालेला दिसत आहे. डोंगराळ भूभाग आणि नदीमुळे बचावकार्याला अडचणी येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अतिवेगामुळे बस थेट नदीत?

अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी अतिवेगामुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. पुढील तपास सुरू आहे.

logo
marathi.freepressjournal.in