Nepal plane crash : नेपाळ दुर्घटनेमध्ये सर्व ७२ जणांचा मृत्यू; ५ भारतीयांचाही समावेश

नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय (Nepal plane crash) विमानतळावर उतरण्यापूर्वी खराब वातावरणामुळे डोंगरावर कोसळले यती एअरलाईन्सचे विमान
Nepal plane crash : नेपाळ दुर्घटनेमध्ये सर्व ७२ जणांचा मृत्यू; ५ भारतीयांचाही समावेश
Published on

नेपाळमध्ये आज सकाळी मोठी विमान दुर्घटना घडली. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरण्यापूर्वी खराब वातावरणामुळे यती एअरलाईन्सचे एक विमान कोसळले. यामध्ये ६८ प्रवाशांसह ४ क्रू मेम्बर्सही होते. या सर्वांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. यामध्ये ५ भारतीय प्रवाशांचाही समावेश आहे. दरम्यान, विमान कोसळल्यानंतर मोठी आग लागल्यामुळे बचाव कार्यामध्ये अडथळे येत होते. तरीही, अद्याप ६५ मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोखरा विमानतळावर उतरताना खराब हवामानामुळे हे विमान डोंगरावर आदळले आणि सेती नदीमध्ये कोसळले. त्यानंतर यामध्ये मोठी आग लागल्याने सर्व ७२ जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. अदयाप ६५ मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून मृतांमध्ये ५ भारतीयदेखील आहेत. काठमांडू, नेपाळमधील भारतीय दूतावासाने हेल्पलाइन क्रमांक जारी केले. नेपाळमधील स्थानिक प्रवाशांसह ५ भारतीय, ४ रशियन नागरिकदेखील होते.

logo
marathi.freepressjournal.in