Nepal plane crash : नेपाळमध्ये कोसळले विमान; विमानातील ७२ जणांपैकी ५ भारतीय प्रवासी

Nepal plane crash : नेपाळमध्ये कोसळले विमान; विमानातील ७२ जणांपैकी ५ भारतीय प्रवासी

नेपाळच्या यती एयरलाईन्सचे विमान कोसळल्याने (Nepal plane crash) मोठी दुर्घटना; आत्तापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती असून हा आकडा वाढण्याची शक्यता
Published on

नेपाळच्या पोखरा परिसरामध्ये मोठी विमान दुर्घटना झाली. (Nepal plane crash) यती एअरलाईन्सच्या या विमानामध्ये ६८ प्रवासी आणि ४ क्रू मेम्बर्ससह ७२ जण होते. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये आत्तापर्यंत एकूण ३२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या विमानामध्ये अनेक परदेशी नागरिकही असून ५ भारतीयांचाही समावेश आहे.

सदर घटनेचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, खराब हवामानामुळे विमान डोंगरावर आदळले आणि सेती नदीमध्ये कोसळले. लँडिंगपूर्वी झालेल्या अपघातानंतर विमानाला आग लागली. अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. दरम्यान अपघातस्थळी हेलिकॉप्टरसह बचाव पथक तैनात करण्यात आले आहे. अद्याप १६हून अधिक मृतदेह बाहेर काढण्यात यश आले असून मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात १० विदेशी नागरिक प्रवास करत होते. यामध्ये ५ भारतीयांचादेखील समावेश आहे.

logo
marathi.freepressjournal.in