Nepal Election Results 2026 : नेपाळमध्ये ओली पराभूत, बालेन शाह यांचा पक्ष सरकार स्थापणार

नेपाळमधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, रॅपर व काठमांडूचे माजी महापौर बलेन्द्र शाह उर्फ बालेन यांनी चार वेळा पंतप्रधान राहिलेले के. पी. शर्मा ओली यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे.
Nepal Election Results 2026 : नेपाळमध्ये ओली पराभूत, बालेन शाह यांचा पक्ष सरकार स्थापणार
Published on

काठमांडू : नेपाळमधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली असून, रॅपर व काठमांडूचे माजी महापौर बलेन्द्र शाह उर्फ बालेन यांनी चार वेळा पंतप्रधान राहिलेले के. पी. शर्मा ओली यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. या विजयामुळे नेपाळमध्ये बालेन यांचा पक्ष राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (आरएसपी) पुढील सरकार स्थापन करणार असल्याचे निश्चित झाले आहे.

गेल्या वर्षी भ्रष्टाचारविरोधी आणि नेतृत्वबदलाची मागणी करत झालेल्या 'जेन-झी' आंदोलनानंतर ही पहिली सार्वत्रिक निवडणूक होती. या निवडणुकीत पारंपरिक राजकीय पक्षांना मतदारांनी मोठा धक्का दिला आहे.

रॅपरवरून राजकारणात आलेले ३५ वर्षीय बलेन्द्र शाह यांनी झापा-५ मतदारसंघात कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळचे अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान ओली यांचा सुमारे ५० हजार मतांनी पराभव केला. शाह यांना ६८,३४८ मते मिळाली, तर ७४ वर्षीय ओली यांना १८,७३४ मते मिळाली. २०२२ मध्ये रवि लामिछाने यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने जाहीर झालेल्या ७८ पैकी ६२ जागांवर विजय मिळवला आहे. या पक्षाने काठमांडू जिल्ह्यातील सर्व १० मतदारसंघांमध्ये स्पष्ट विजय मिळवला आहे.

logo
marathi.freepressjournal.in