तेल अवीव : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी त्यांच्या विरोधातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये राष्ट्रपती इसाक हर्जोग यांच्याकडे माफीची मागणी केली आहे. नेत्यान्याहू यांचे वकील अमित हाद्द यांनी १११ पानांचा अर्ज सादर केला आहे, असे राष्ट्रपती कार्यालयाने सांगितले.
इस्त्रायली कायद्यानुसार, न्यायालयाने दोषी ठरवलेल्या लोकांना माफी देण्याचा अधिकार राष्ट्रपतींना आहे. जनहिताशी संबंधित प्रकरणांमध्ये, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होण्याआधीही माफी दिली जाऊ शकते.
गेल्याच आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही इस्त्रायलचे राष्ट्रपती इसाक हर्जोग यांना पत्र लिहून नेत्यान्याहू यांच्या बाजूने माफीची विनंती केली होती.