नेतन्याहूंच्या भाषणावर ७५ देशांचा बहिष्कार

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण केले. व्यासपीठावर येताच ७५ देशांच्या प्रतिनिधींनी घोषणाबाजी करून त्यांचा विरोध केला आणि सभागृहाबाहेर पडले. ३ मिनिटे शांत राहिल्यानंतर नेत्यनाहू यांनी म्हटले की, ‘इथे आणखी कोणी भित्रा असेल तर त्याने बाहेर जावे.”
नेतन्याहूंच्या भाषणावर ७५ देशांचा बहिष्कार
नेतन्याहूंच्या भाषणावर ७५ देशांचा बहिष्कारX | व्हिडिओवरून घेतलेला स्क्रीनशॉट
Published on: 

न्यूयॉर्क : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी गुरुवारी संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण केले. व्यासपीठावर येताच ७५ देशांच्या प्रतिनिधींनी घोषणाबाजी करून त्यांचा विरोध केला आणि सभागृहाबाहेर पडले. ३ मिनिटे शांत राहिल्यानंतर नेत्यनाहू यांनी म्हटले की, ‘इथे आणखी कोणी भित्रा असेल तर त्याने बाहेर जावे.”

यावेळी गॅलरी नेतन्याहू यांच्या समर्थकांनी भरलेली होती. त्यांनी टाळ्या वाजवून राष्ट्राध्यक्षांचे स्वागत केले आणि ‘अम यिस्राएल चाई’ म्हणजेच ‘इस्रायलचे लोक जिवंत आहेत’, अशा घोषणा दिल्या.

नेतन्याहू यांनी आपल्या भाषणात गाझा, इराण आणि लेबनॉनवरील इस्रायली कारवाईचा उल्लेख केला. त्यांनी ट्रम्प यांची प्रशंसा केली, तसेच न्यूयॉर्कचे महापौर ममदानी आणि युरोपियन नेत्यांवर टीका केली.

नेतन्याहूंनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या हल्ल्याचा उल्लेख करत इस्रायलच्या लष्करी कारवाईचे समर्थन केले. त्यांनी म्हटले की, “हमासच्या दहशतवाद्यांनी ज्या प्रकारे इस्रायलींना मारले, ते अत्यंत भयावह होते. अशा भयावहतेची कल्पनाही करता येत नाही.”

नेतन्याहू पुढे म्हणाले, “शत्रूंना वाटले होते की, इस्रायल कोसळेल, पण तसे झाले नाही. आम्ही उठून सिंहासारखे लढलो. इस्रायलने नरसंहार केला नाही. इस्रायलने नरसंहार रोखला. जर हमास समर्थकांना संधी मिळाली असती, तर त्यांनी प्रत्येक ज्यूला ठार मारले असते.”

न्यूयॉर्कचे महापौर ममदानींवर टीका

नेत्यनाहू यांनी न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांना लक्ष्य केले. नेतन्याहू म्हणाले की, “जगातील सर्वात मोठी ज्यू लोकसंख्या असलेल्या या शहरात ज्यूंना आता सुरक्षित वाटत नाही. त्यांनी ममदानी यांना हमास समर्थक म्हटले. त्यांनी ममदानी यांच्या पत्नीवरही टीका केली, त्या सोशल मीडियावर इस्रायलविरोधी पोस्ट्सना पसंती देतात असे म्हटले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

logo
marathi.freepressjournal.in