सौदीतील अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू

पश्चिम सौदी अरेबियातील जिझानजवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
सौदीतील अपघातात नऊ भारतीयांचा मृत्यू
Published on

रियाध : पश्चिम सौदी अरेबियातील जिझानजवळ झालेल्या भीषण अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला आहे. जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूतावासाने याबाबतची माहिती दिली आहे. तसेच अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती दिली जात आहे. परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी या दुर्घटनेबाबत तीव्र दुःख व्यक्त केले आहे.“सौदी अरेबियाच्या पश्चिम क्षेत्रातील जिझान येथे झालेल्या रस्ते अपघातात नऊ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. भारताचे वाणिज्य दूतावास याप्रकरणी पूर्ण सहकार्य करत आहे. पुढील चौकशीसाठी हेल्पलाईनची स्थापना करण्यात आली आहे,” असे भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आले.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले की, “या अपघाताबद्दल आणि जीवितहानीबद्दल जाणून घेतल्याबद्दल दुःख झाले. जेद्दाहमधील वाणिज्य दूतावासाशी संपर्क झाला आहे.

logo
marathi.freepressjournal.in