आंतरराष्ट्रीय
रणभूमीवर कोणत्याही संघर्षाचा तोडगा निघू शकत नाही - मोदी; शांततेसाठी सर्वतोपरी सहकार्यास भारत तयार
कोणत्याही संघर्षाचा तोडगा रणभूमीवर निघू शकत नाही यावर भारताचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी शक्य तितके सहकार्य करण्यास भारत तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सांगितले.
वाॅर्सा : कोणत्याही संघर्षाचा तोडगा रणभूमीवर निघू शकत नाही यावर भारताचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी शक्य तितके सहकार्य करण्यास भारत तयार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे सांगितले. पोलंडमधून संघर्षग्रस्त युक्रेनकडे रवाना होण्यापूर्वी ते बोलत होते.
पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांच्याशी मोदी यांनी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली.
पोलंडचा दौरा आटोपून मोदी युक्रेनकडे रेल्वेने रवाना झाले. युक्रेन आणि पश्चिम आशियातील संघर्ष आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे, असे मोदी यांनी टस्क यांच्याशी चर्चा केल्यानंतर जारी केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे.