Nobel Peace Prize 2023: इराणच्या नर्गिस मोहम्मदी यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या मानकरी

नर्गिस मोहम्मती या सध्या ५१ वर्षाच्या असून अजूनही त्या इराकच्या तुरुंगात कैद आहेत.
Nobel Peace Prize 2023: इराणच्या नर्गिस मोहम्मदी यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराच्या मानकरी

या वर्षीचा नोबेल शांतता पुरस्कार जारी करण्यात आला आहे. नोबेल समितीने इराणमधील महिलांवरील अत्याचाराविरुद्धचा लढा आणि मानवधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना २०२३ चा नोबेल शांती पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे.

इराणमधील महिलांच्या हक्क अधिकारांसाठी काम केलेल्या नर्गिस मोहम्मदी यांना तेथील सरकारने अटक केली होती. इराण सरकारच्या विरोधात प्रपोगंडा पसरवण्याच्या आरोपाखाली त्यांना ३१ वर्षे तुरुंगवास आणि १५४ चाबकाचे फटके अशी शिक्षा सुनावण्यात आली होती. नर्गिस मोहम्मती या सध्या ५१ वर्षाच्या असून अजूनही त्या इराकच्या तुरुंगात कैद आहेत.

यांना दिला जातो शांततेचा नोबेल

शांततेचा नोबेल पुरस्कार हा देशातील गरजूंचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या तसंच नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करण्याचा प्रचार करत जगाला शांततेची शिकवण देतात. कोणत्याही दोन गटातील संघर्ष रोखण्यासाठी आणि मानवी हक्कांचं रक्षण करण्याचा प्रतयत्न करणाऱ्यांना दिला जातो. यंदा महिलांवरील अत्याचाराविरुद्ध लढा दिल्याबद्दल आणि मानवाधिकारांसाठी काम केल्याबद्दल नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२२ सालचा शांततासाठीचा नोबेल पुरस्कार बेलारुसचे मानवअधिकार कार्यकर्ते अॅलेस बिलियात्स्की आणि र्शियन मानवाधिकार संघटना मेमोरियल तसंच युक्रेनियन मानवाधिकार संघटना सेंटर पॉर स्विव्हिल लिबर्टीज या दोन संस्थांना देण्यात आला होता.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in